रेल्वे स्टेशन परिसरात येणाऱ्या वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांची गांधीगिरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 01:45 PM2018-12-22T13:45:48+5:302018-12-22T13:46:21+5:30
अकोला: कायदा मोडणाºयावर कारवाईचा बडगा उगारण्याऐवजी हतबल झालेल्या रेल्वे पोलिसांनी कारवाईचे शस्त्र न उगारता, धाकदपट न करता बेशिस्त आॅटोरिक्षा चालक, दुचाकी चालकांविरुद्ध गांधीगिरीचा मार्ग पत्करला.
अकोला: कायदा मोडणाºयावर कारवाईचा बडगा उगारण्याऐवजी हतबल झालेल्या रेल्वे पोलिसांनी कारवाईचे शस्त्र न उगारता, धाकदपट न करता बेशिस्त आॅटोरिक्षा चालक, दुचाकी चालकांविरुद्ध गांधीगिरीचा मार्ग पत्करला. पोलिसांच्या कारवाईलाही न जुमानणाºया आॅटोरिक्षा चालक, दुचाकी चालकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले आणि रेल्वे स्टेशनवरील वाहनतळावर बेशिस्तीत वाहने उभी न करण्याची विनंती पोलिसांनी त्यांना केली.
रेल्वेस्थानकावरील आॅटोरिक्षा आणि दुचाकी चालक बेशिस्त पद्धतीने, वाट्टेल त्या ठिकाणी वाहने उभी करतात. त्यामुळे प्रवाशांना तर त्रास होतोच, वाहतुकीलाही अडथळा होतो. रेल्वे स्टेशन परिसरात वाहनतळ उपलब्ध असतानाही त्याचा वाहनचालक त्याचा वापर करीत नाही आणि वाहने रेल्वेस्थानकासमोरील रस्त्यावर उभे करतात. बºयाच वेळा या बेशिस्त वाहन चालकांविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाच्यावतीने कारवाई केल्या जाते. दंडही वसूल केला जातो; परंतु पोलिसांच्या कारवाईलाही वाहन चालक जुमानत नसल्याचे पाहून, पोलिसांनी त्यांची कामाची पद्धत बदलली. रेल्वे स्टेशन परिसरात बेशिस्त आॅटोरिक्षा, दुचाकी उभी करणाºया चालकांवर कारवाई करण्याऐवजी, गांधीगिरी मार्गाने त्यांना गुलाबपुष्प देऊन पुन्हा बेशिस्तपणे वाहने उभी न करता, वाहनतळावरच वाहने उभी करण्याची विनंती पोलिसांच्यावतीने करण्यात आली. हा गांधीगिरीचा उपक्रम आरपीएफ पोलीस निरीक्षक विनोदकुमार लांजेवार, रेल्वे स्टेशन अधीक्षक ब्रिजेश कुमार, वाणिज्य प्रबंधक एम. बी. निकम, कर्मचारी विजय इंगळे यांनी राबविला. (प्रतिनिधी)