गांधीग्रामच्या नवीन पुलाच्या बांधकामाला गती मिळणार !
By admin | Published: October 15, 2016 03:13 AM2016-10-15T03:13:54+5:302016-10-15T03:13:54+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाने न्यायालयीन लढा जिंकला.
संजय खांडेकर
अकोला, दि. १४- गत काही महिन्यांपासून रखडलेल्या गांधीग्राम येथील नवीन पुलाच्या बांधकामातील अडथळा दूर झाला आहे. न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेप्रकरणी अकोल्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निकाल लागल्याने या पुलाच्या बांधकामाला आता गती मिळणार आहे.
अकोलापासून १८ कि.मी. अंतरावर गांधीग्राम येथे १९२५ मध्ये देशातील पहिला सिमेंटचा पूल बांधण्यात आला. ब्रिटिशकालीन या पुलाच्या बांधकामाची मुदत २0 वर्षांंंंपूर्वीच संपली आहे. अशा धोकादायक परिस्थितीत मध्य प्रदेश, महाराष्ट्र व आंध्र प्रदेश या तीन राज्यांना जोडणार्या या पुलावरू न जड वाहतूक आजही अविरत सुरू आहे. या मार्गावर नवीन पुलाचे बांधकाम व्हावे, यासाठी ह्यलोकमतह्णने २00५ पासून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. अखेर मागील वर्षी या पुलाचे बांधकाम सुरू झाले. गोपालखेड येथून जाणारा हा पूल ६७0 फूट लांब आणि ५९ फूट उंच असून, पुलाचे ८0 टक्के काम पूर्ण झाले. दरम्यान, पुलाच्या बांधकामाबाबत याचिका दाखल झाली. न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे काही महिन्यांपासून नवीन पुलाचे बांधकाम रखडलेले होते.
१२ कोटी खर्च करूनही पूल अजूनही तयार नसल्याने या मार्गाने जाणार्या वाहतूकदारांमध्ये नाराजीचा सूर होता.
गांधीग्रामच्या नवीन पूल बांधकामप्रकरणी न्यायालयीन निकाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लागला आहे. दरम्यान, यवतमाळ येथील पूल व्यवस्थापन कार्यालय अकोल्यात येत असल्यामुळे लवकरच बांधकाम पूर्ण केल्या जाईल.
-मिथिलेश चौहान,
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला.