गणेश विसर्जनासाठी खामगावात मोबाईल कुंड!

By admin | Published: September 22, 2015 01:06 AM2015-09-22T01:06:52+5:302015-09-22T01:06:52+5:30

नगरपालिका प्रशासनाचा अभिनव उपक्रम.

Ganesh immersion in Khamagate mobile kund! | गणेश विसर्जनासाठी खामगावात मोबाईल कुंड!

गणेश विसर्जनासाठी खामगावात मोबाईल कुंड!

Next

अनिल गवई/ खामगाव (बुलडाणा): गणेश विसर्जनासाठी खामगावात फिरत्या विसर्जन कुंडाचा वापर करण्यात येणार आहे. या विसर्जन कुंडासोबत ब्रम्हवृंदही राहणार असून विसर्जनाचे विधीवत सोपस्कार करण्यास त्यांची मदत होणार आहे. नगरपालिकेने या उपक्रमासाठी जय्यत तयारी चालविली आहे. खामगाव शहराची संवेदनशील शहरांमध्ये गणना केली जाते. त्यामुळे गणेशोत्सव काळात शहरात चोख बंदोबस्त असतो. या शहरातून कोणतीही मोठी नदी वाहत नसल्यामुळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार्‍या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या आणि घरगुती श्री गणेशांचे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरपालिका मैदानावरील विहिरींमध्ये विसर्जन करण्यात येते. दरम्यान, २0 फूट बाय २0 फूट आकाराच्या या विहिरीत शहरा तील दहा हजारांपेक्षा जास्त भाविकांच्या मूर्तींंचे विसर्जन होत असते. त्यामुळे गर्दी नियंत्रित करण्यासाठी पालिका प्रशासनासोब तच पोलिस प्रशासनाचीही दमछाक होते. विसर्जनाच्या दिवशी मू र्ती अक्षरक्ष: बांबूच्या साहाय्याने विहिरीत कोंबल्या जातात. या पार्श्‍वभूमीवर गर्दी नियंत्रित करण्यासोबतच, प्रदुषण रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने यावर्षी फिरते कुंड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

*विदर्भातील पहिला प्रयोग!

          खामगाव पालिकेने शहरातील विविध भागांची विभागणी करून फिरते कुंड (मोबाईल कुंड) तयार करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. यामाध्यमातून शहराच्या विविध भागात थेट भाविकांच्या घरून, अथवा चौकातून गणेशमूर्ती कुंडात विसजिर्त करण्याचे पालिकेचे प्रयत्न आहेत. विदर्भातील हा एकमेव प्रयोग असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

Web Title: Ganesh immersion in Khamagate mobile kund!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.