डोळ्यावर पट्टी बांधून साकारले शाडू मातीचे बाप्पा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 03:54 PM2018-09-03T15:54:16+5:302018-09-03T15:54:35+5:30
अकोला- पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही संकल्पना घेऊन कार्यरत असलेले पर्यावरणप्रेमी तसेच क्रीडा पटू शरद कोकाटे यांनी रविवारी डोळ्यावर पट्टी बांधून गणरायांची मूर्ती साकारण्याचा विक्रम केला.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सभागृहात भारतीय क्षत्रिय महासभेच्यावतीने शाडू मातीतून गणरायाची मूर्ती घडविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत सहभागी दीड हजार विद्यार्थ्यांना मूर्ती घडविण्याचे प्रशिक्षण दिल्यानंतर शरद कोकाटे यांनी डोळ्यावर पट्टी बांधून गणरायाची मूर्ती घडविली. मूर्ती पूर्ण होताच टाळ्यांच्या गजरात कोकाटे यांचे अभिनंदन उपस्थितांनी केले.
अनेक वर्षांपासून पर्यावरणपूरक मूर्तीचा आग्रह धरणारे व त्यासाठी जनजागृती करणाऱ्या शरद कोकाटे यांचा हा उपक्रम अंध मुलांसाठी होता. पुढील वर्षी अंध मुलांना मूर्ती घडविण्याचे कसब शिकवायचे आहे. त्याकरिता डोळ्यावर पट्टी बांधून मी यावर्षी मूर्ती घडविण्याचे प्रात्यक्षिक केले, असे कोकाटे यांनी सांगितले.