बकरी चोरांची टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:18 AM2021-03-08T04:18:08+5:302021-03-08T04:18:08+5:30

गुन्हे शाखेची कारवाई दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत अकोला : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बकऱ्या तसेच जनावरे चोरणाऱ्या टोळीला ...

A gang of goat thieves disappeared | बकरी चोरांची टोळी गजाआड

बकरी चोरांची टोळी गजाआड

Next

गुन्हे शाखेची कारवाई दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत

अकोला : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बकऱ्या तसेच जनावरे चोरणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी जेरबंद केले. या चोरट्यांच्या टोळीकडून दीड लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी उषा रामेश्वर तराळे यांच्या गोठ्यातील दोन बकऱ्या चोरी गेल्याची तक्रार त्यांनी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनातील पथकाला या बकरी चोरट्यांची माहिती मिळाली. त्यांनी यावरून शिवणी येथील रहिवासी शेख उमेर शेख मुखतार यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता आरोपीने त्याच्या साथीदारांसोबत अशा प्रकारची चोरी केल्याची माहिती दिली. यावरून पोलिसांनी शेख मकसूद शेख महेबुब राहणार ताजनापेठ, रियाजुद्दीन नसीमोद्दीन रा अकोट फाईल, तौफीक खान राहणार तेलीपुरा या तिघांना ताब्यात घेतले. या आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जनावरे व बकऱ्यांची चोरी केल्याची कबुली दिली. यावरून पोलिसांनी आरोपींना बोरगाव मंजू पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या चोरट्यांकडून पोलिसांनी दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ, पीएसआय नरेंद्र पद्मने, दशरथ बोरकर, गोकूळ चव्हाण, स्वप्निल खेडकर, विजय कपले यांनी केली.

Web Title: A gang of goat thieves disappeared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.