चिमुकलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींचा आज फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 12:31 PM2020-03-13T12:31:15+5:302020-03-13T12:31:25+5:30
१५ एप्रिल २०१७ रोजी एका ११ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली होती.
अकोला : रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या त्रिवेणेश्वर कॉम्प्लेक्समध्ये २०१७ मध्ये एका कचरा वेचणाºया ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी पाशवी अत्याचार केला होता. या प्रकरणाचा अंतिम निकाल शुक्रवारी लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची सुनावणी प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.आय. आरलँड यांच्या न्यायालयात सुरू आहे.
त्रिवेणेश्वर कॉम्प्लेक्समध्ये १५ एप्रिल २०१७ रोजी एका ११ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली होती. या अत्याचाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळावरील त्या अल्पवयीन मुलीची परिस्थिती पाहून पोलिसांचे मनही विचलित झाले होते. सदर चिमुकली रक्ताच्या थारोळ्यात असल्याचे दिसताच पोलिसांनी तिला उचलून सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले होते. या प्रकरणात पोलिसांनी आधी एका संशयितास अटकही केली होती; मात्र पीडितेने दिलेल्या जुबानी रिपोर्टवरून पोलिसांनी आरोपींची रेखाचित्र जारी केले होते. घटनेनंतर तीन दिवसांनी १८ एप्रिल २०१७ रोजी यातील आरोपी गोविंद परसराम साखरे, शेख मुस्तकीम, मोहसीन कुरेशी या तीन नराधमांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून आरोपी कारागृहात आहेत, तर या प्रकरणाच्या अंतिम युक्तिवादास १ आॅगस्ट २०१९ पासून प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आय. आरलँड यांच्या न्यायालयात सुरुवात झाली होती. सध्या हे प्रकरण अंतिम टप्प्यात असून, शुक्रवारी प्रकरणात निकाल लागण्याची शक्यता आहे.
-------------------------
अशी घडली होती घटना
सिटी कोतवाली पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया एका खासगी शाळेत इयत्ता पाचवीमध्ये शिकणाºया चिमुकलीवर त्रिवेणेश्वर कॉम्प्लेक्समध्ये तीन नराधमांनी पाशवी अत्याचार केला होता. ५० ते ५५ वयोगटातील इसम कॉम्प्लेक्सच्या बाहेर उभा होता. या इसमाने मुलीला तू दुसºया मजल्यावर जा, त्या ठिकाणी दोन युवक असून, ते तुला पैसे देतील, असे म्हणून तिला या कॉम्प्लेक्सच्या दुसºया मजल्यावर पाठविले होते. त्यामुळे ही मुलगी दुसºया मजल्यावर गेली होती. या ठिकाणी दुकाने नसल्याने वर्दळ नव्हती. यातील दोन युवकांनी तिच्यावर अत्याचार केला होता.