सोने विकण्याचा बनाव करून लुटणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 02:24 AM2017-12-05T02:24:19+5:302017-12-05T02:25:51+5:30

कमी भावात सोने विकण्याचा बनाव करायचा, खरेदीदाराला पैसे घेऊन बोलवायचे आणि सोने खरेदीसाठी एखादा व्यक्ती पैसे घेऊन आल्यावर टोळीतील दोघांनी पैसे घ्यायचे आणि दोघा जणांनी पोलिसाच्या गणवेशात येऊन छापा घालण्याचे नाटक करायचे व त्या व्यक्तीकडील पैसे घेऊन पोबारा करायचा, असे नाट्य रचून अनेकांना लाखो रुपयांनी गंडा घालणार्‍या टोळीला पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सोमवारी पहाटे अटक केली. 

The gang of robbers is selling gold | सोने विकण्याचा बनाव करून लुटणारी टोळी गजाआड

सोने विकण्याचा बनाव करून लुटणारी टोळी गजाआड

googlenewsNext
ठळक मुद्देनाट्य रचून अनेकांना लाखो रुपयांनी गंडा घालणारी टोळीगंडा घालणार्‍या टोळीला पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सोमवारी पहाटे अटक केली

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: कमी भावात सोने विकण्याचा बनाव करायचा, खरेदीदाराला पैसे घेऊन बोलवायचे आणि सोने खरेदीसाठी एखादा व्यक्ती पैसे घेऊन आल्यावर टोळीतील दोघांनी पैसे घ्यायचे आणि दोघा जणांनी पोलिसाच्या गणवेशात येऊन छापा घालण्याचे नाटक करायचे व त्या व्यक्तीकडील पैसे घेऊन पोबारा करायचा, असे नाट्य रचून अनेकांना लाखो रुपयांनी गंडा घालणार्‍या टोळीला पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सोमवारी पहाटे अटक केली. 
पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांना जिल्हय़ात कमी भावात सोने विकण्याचा बनाव करून लुटणारी टोळी जिल्हय़ात कार्यरत असल्याची माहिती मिळाली. विशेष पथकातील एका पोलीस कर्मचार्‍याने ग्राहक म्हणून टोळीचा म्होरक्या असलेल्या महादेव ज्ञानदेव मुर्तडकर (३३ रा. पिंजर) याला मोबाइलवरून संपर्क साधला आणि भुसावळ येथून बोलत असल्याचे सांगून सोने खरेदी करायचे आहे, असे सांगितले. त्यावर महादेव मुर्तडकर याने १३ हजार रुपये तोळा या भावाने अडीच किलो सोने अडीच लाख रुपयांमध्ये देण्याचे कबूल केले. त्यानुसार विशेष पोलीस पथकाने रेडवा येथे रविवारीच सापळा रचला. सुरुवातीला महादेव मुर्तडकर याने ग्राहक असलेल्या पोलीस कर्मचार्‍याला २0 लाख रुपये घेऊन पिंजरला बोलावले; परंतु नंतर त्याने टाळाटाळ करीत भेटण्याचे ठिकाण बदलले. पोलीस कर्मचार्‍याने सातत्याने त्याच्या मोबाइलवर संपर्क साधून सोने देण्याचा आग्रह केला. त्यामुळे महादेवने ग्राहक बनलेल्या पोलीस कर्मचार्‍याला कारंजा-मूर्तिजापूर टी पॉइंटजवळ बोलावले. या ठिकाणी महादेव मुर्तडकरचा सहकारी गजानन पांडुरंग बुटे (रा. पिंजर) याने आगपेटीमध्ये असलेले सोन्याचे तीन शिक्क  दाखवले. आणखी असे काही सोन्याचे शिक्के असल्याचे त्याने सांगितले. 
काही वेळात लगेच या ठिकाणी टोळीतील दोन तोतये पोलीस कर्मचारी बनून मंगेश काशिराम राठोड व राजू अंबू राठोड (३६, रा. वडगाव) हे दोघे आले व पोलीस असल्याचे सांगत, विशेष पथकातील पोलीस कर्मचार्‍याला धाकदपट करू लागले. परिसरातच दबा धरून बसलेल्या विशेष पथकाच्या पोलीस कर्मचार्‍यांनी टोळीतील चौघांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून तीन दुचाकी व चार चाकू जप्त केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर व अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. 

Web Title: The gang of robbers is selling gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.