बेकरी उत्पादकाला लुटणारी टोळी गजाआड

By admin | Published: January 30, 2015 01:38 AM2015-01-30T01:38:20+5:302015-01-30T01:38:20+5:30

आकोटफैल पोलिसांची कारवाई; यवतमाळच्या बेकरी उत्पादकाला लुटणारे चार चोरटे गजाआढ.

A gang of robbery bakery producer | बेकरी उत्पादकाला लुटणारी टोळी गजाआड

बेकरी उत्पादकाला लुटणारी टोळी गजाआड

Next

अकोला : यवतमाळच्या बेकरी उत्पादकाला लुटणार्‍या चार जणांच्या टोळीला गुरुवारी आकोटफैल पोलिसांनी गजाआड केले. टोळीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने चारही आरोपींना २ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. पोलिसांनी त्यांच्याकडून लुटीतील ४0 हजारांची रोकड जप्त केली आहे.
यवतमाळ शहरात शादाबाग येथील रहिवासी बेकरी उत्पादक इक्राम-उल-हक मुबारक हुसैन (४२) यांच्या तक्रारीनुसार, २८ जानेवारी रोजी आकोटफैल रोडवरील एका बेकरीमध्ये माल विकण्यासाठी ते आले होते. यावेळी बेकरी मालकाने त्यांना मालाचे १ लाख ५६ हजार रुपये दिले.
रात्री १0.३0 च्या सुमारास ते क्लिनरसह एपी 0१ वाय ९२८९ क्रमांकाच्या ट्रकने परत जाण्यासाठी निघाले असता, त्यांना आकोट रोडवरील बीएसएनएल टॉवरनजीक आरोपी अब्दुल सत्तार अब्दुल कलीम (१७ रा. मानेक टॉकीजजवळ), सैयद हसन अली सैयद अकबर अली(१९ रा. मनकर्णा प्लॉट), वसीम खान रहिम खान (२७ रा. लक्कडगंज) आणि सैयद इम्रान सैयद कमरूद्दीन(२७ रा. लक्कडगंज) यांनी अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व चाकूचा धाक दाखवून ट्रकमध्ये असलेली बॅग लंपास केली. याप्रकरणी आकोटफैल पोलिसांनी भादंविच्या कलम ३९५ नुसार जबरी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. आकोटफैल पोलिसांनी गुरुवारी चारही आरोपींना गजाआड केले आणि त्यांना न्यायालयात हजर केले.

Web Title: A gang of robbery bakery producer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.