तीन जणांची टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:17 AM2021-04-17T04:17:33+5:302021-04-17T04:17:33+5:30

पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांचा आदेश अकोला : शहरासह जिल्हाभरात टोळीने गुन्हे करणाऱ्या दोन जणांच्या टोळीला पोलीस अधीक्षक जी ...

A gang of three was deported for two years | तीन जणांची टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार

तीन जणांची टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार

Next

पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांचा आदेश

अकोला : शहरासह जिल्हाभरात टोळीने गुन्हे करणाऱ्या दोन जणांच्या टोळीला पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या आदेशाने शुक्रवारी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. आतापर्यंत पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने जिल्ह्यातील सुमारे ३० टोळ्यांना हद्दपार करण्यात आले आहे.

जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरिहर पेठ येथील रहिवासी आकाश उर्फ गोलू चांदूरकर वय २६ वर्ष व त्याचा साथीदार विक्की रमेश श्रीनाथ वय २३ वर्ष दोघेही राहणार हरिहर पेठ जुने शहर हे दोघे जण जिल्ह्याच्या विविध भागात टोळीने गुन्हे करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांना मिळाली. या माहितीवरून दोन्ही गुन्हेगारांवरील गुन्हेगारीची मालिका पाहता त्यांनी या दोघाविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. यावरून जुने शहर पोलिसांनी या दोन गुन्हेगारांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांकडे सादर केली. जुने शहर पोलीस ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात या दोघांनीही टोळीने अनेक गुन्हे केल्याचे समोर आले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक तसेच त्यांना सुधारण्यासाठी वारंवार कारवाई करण्यात आली ; मात्र दोन्ही गुन्हेगार पोलिसांच्या या कारवाईला जुमानत नसल्याने पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या आदेशाने या दोन्ही गुन्हेगारांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी हा आदेश शुक्रवारी दिला असून टोळीला जिल्ह्याच्या बाहेर काढण्यात आले आहे.

Web Title: A gang of three was deported for two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.