दोन जणांची टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:23 AM2021-08-21T04:23:16+5:302021-08-21T04:23:16+5:30

अकोला : जिल्हाभरात टोळीने गुन्हे करणाऱ्या दोन जणांच्या टोळीला पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या आदेशाने जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार ...

A gang of two was deported for two years | दोन जणांची टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार

दोन जणांची टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार

Next

अकोला : जिल्हाभरात टोळीने गुन्हे करणाऱ्या दोन जणांच्या टोळीला पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या आदेशाने जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. आतापर्यंत पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने जिल्ह्यातील सुमारे ३६ टोळ्यांना हद्दपार करण्यात आले आहे. या टोळीतील दोघेही चांणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तुलंगा येथिल रहिवासी आहे.

चांणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुलंगा येथील रहिवासी राजाभाऊ नामदेव किरतकर वय ४२ वर्षे व योगेश रमेश हिवराळे वय ३३ वर्षे हे दोघेजण जिल्ह्याच्या विविध भागांत टोळीने गुन्हे करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांना मिळाली. या माहितीवरून दोन्ही गुन्हेगारांवरील गुन्हेगारीची मालिका पाहता पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी या दोघांविरुद्ध हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. यावरून चांणी पोलिसांनी या दोन गुन्हेगारांविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती पोलिसांकडे सादर केली. उरळ पोलीस ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत या दोघांनीही टोळीने अनेक गुन्हे केल्याचे समोर आले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक तसेच त्यांना सुधारण्यासाठी वारंवार कारवाई करण्यात आली; मात्र दोनही गुन्हेगार पोलिसांच्या या कारवाईला जुमानत नसल्याने पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या आदेशाने या दोन्ही गुन्हेगारांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी हा आदेश शुक्रवारी दिला असून, टोळीला जिल्ह्याच्या बाहेर काढण्यात आले आहे.

Web Title: A gang of two was deported for two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.