काेऱ्या करकरीत एक्सयुव्ही कार पळविणारी टाेळी जेरबंद; स्टाॅक यार्डमधून पळविल्या ७० लाखांच्या कार
By सचिन राऊत | Published: May 8, 2024 08:09 PM2024-05-08T20:09:41+5:302024-05-08T20:10:08+5:30
एका आराेपीसह चार विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात
अकाेला : एमआयडीसी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील स्टाॅक यार्डमधून काेऱ्या करकरीत ७० लाखांच्या एक्सयुव्ही कार पळविणाऱ्या अट्टल चाेरटयांच्या टाेळीला अटक करण्यात एमआयडीसी पाेलिसांना यश आले आहे. चार विधीसंघर्षग्रस्त बालकांना साेबत घेउन एका आराेपीने या चाेऱ्या केल्याची माहीती तपासात समाेर आली असून पाेलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. या चाेरीतील तीन कारसह चाेरीसाठी वापरलेल्या दाेन दुचाक्या पाेलिसांनी जप्त केल्या आहेत.
महींद्रा कंपनीच्या वाहनांचे स्टाॅक यार्ड एमआयडीसीमध्ये असून यामधून अज्ञात चाेरटयांनी एक्सयुव्ही ७००, स्कॉपिओ एन झेड टु या दाेन एक्सयुव्ही चाेरीला गेल्याचे फीर्यादी व दिपक वक्टे यांनी एमआयडीसी पाेलिसांना सांगीतले. यावरुन एमआयडीसी पाेलिसांना मिळालेल्या माहीतीचे आधारे गुन्हयातील आरोपी मिर्झा अबेद बेदमिर्झा सईद बेग रा. कलाल चाळ अकोला यास ताब्यात घेतले त्याच्यासाेबतच चाेरी करण्यासाठी चार विधी संर्घषग्रस्त बालक असल्याचे समाेर आल्याने पाेलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले.
त्यानंतर चोरीला गेलेले वाहने एकुण तीन फोर व्हिलर व गुन्हयात वारलेल्या दोन मोटर सायकल असा एकून ७० लाख रुनयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या चाेरटयांकडून आणखी वाहने मिळण्याची शक्यता पाेलिसांना आहे. ही कारवाइ पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सतिष कुळकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वैशाली मुळे, सुरेश वाघ, विजय जामनिक, राठोड, विजय अंभोरे, अजय नागरे, मोहन ढवळे, सुनिल टाकसाळे, उमेश इंगळे, मोहन भेंडारकर, भुषण सोळंके, अनुप हातोळकर, सचिन घनबहादुर, निलेश वाकोडे व एमआयडीसी पाेलिसांनी केली.