थेट गोव्यात जाण्यासाठी गणपती स्पेशल रेल्वेगाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:20 AM2021-08-29T04:20:41+5:302021-08-29T04:20:41+5:30
परतीच्या प्रवासात ०१२५६ ही विशेष गाडी ५ व १२ नोव्हेंबर रोजी करमळी स्थानकावरून रात्री ८.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या ...
परतीच्या प्रवासात ०१२५६ ही विशेष गाडी ५ व १२ नोव्हेंबर रोजी करमळी स्थानकावरून रात्री ८.४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ८.१० वाजता नागपूर येथे पोहोचेल.
या गाड्यांना वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, नाशिकरोड, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि या स्थानकांवर थांबा असणार आहे. या विशेष गाड्यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग २९ ऑगस्टपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि रेल्वेच्या संकेतस्थळावर सुरु होईल.
स्लिपर क्लासचे ११ डबे
या विशेष गाडीमध्ये एक द्वितीय वातानुकूलित, चार तृतीय वातानुकूलित, अकरा शयनयान आणि सहा द्वितीय श्रेणीचे डबे असणार आहेत. या विशेष गाड्यांमध्ये कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच चढताना, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानकावर कोविड १९ शी संबंधित सर्व नियमांचे पालन करून प्रवासाची परवानगी असेल.