कचऱ्याचा नऊ लाखांचा ठेका, तरी ५० रुपयांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:16 AM2021-01-02T04:16:30+5:302021-01-02T04:16:30+5:30
तेल्हारा नगर परिषदेमध्ये चार वर्षांपूर्वी एका महिन्याला एक लाख रुपयांच्या आत कचरा उचलण्याचा ठेकेदाराला ठेका दिला जात ...
तेल्हारा नगर परिषदेमध्ये चार वर्षांपूर्वी एका महिन्याला एक लाख रुपयांच्या आत कचरा उचलण्याचा ठेकेदाराला ठेका दिला जात असे, परंतु आता मात्र एका महिन्याला कचरा उचलण्याचा ठेका हा नऊ लाख रुपयांपर्यंत दिला गेला आहे. मात्र कचरा उचलण्याकरिता पुरेशा प्रमाणात मजूर व गाड्यांची संख्या दिसत नाही. वेळेवर कचरा उचलल्या जात नाही. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नियमित कचऱ्याचे ढीग उचलल्या जात नाहीत. अशा तक्रारी बहुतांश भागातील नागरिक करीत आहेत. कचरा उचलण्याकरिता जे मजूर काम करीत आहेत. त्यापैकी काही मजूर हे घरासमोरील कचरा उचलण्याकरिता पैशांची मागणी करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नेमके नगरपालिकेच्या पदाधिकारी अधिकाऱ्यांचे लक्ष कुठे आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सदर कचऱ्याच्या ठेक्यासंदर्भात यापूर्वी अनियमितता व गैरप्रकाराबाबत तक्रार करण्यात आल्याचे समजते संबंधित निविदाही काढताना कुठेतरी मॅनेज करण्याच्या हिशोबाने काढण्यात आल्याचे आरोप होत आहे.
""''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''
अद्याप मला याबाबत माहिती नाही. माझ्याकडे तक्रार आली नाही. याबाबत जनतेमधून तक्रार आल्यास संबंधित कंत्राटदारला जाब विचारून चौकशी केली जाईल.
जयश्री पुंडकर, नगराध्यक्ष, नगर परिषद, तेल्हारा