अकोल्यात घंटागाड्यांचा लवाजमा; कचरा जैसे थे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 12:58 PM2020-08-08T12:58:49+5:302020-08-08T12:58:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : शहरातील कचऱ्याची समस्या निकाली काढण्यासाठी मनपाच्या मोटार वाहन विभागात वाहनांचा अक्षरश: लवाजमा दिसून येतो. ...

Garbage problem continue in Akola city | अकोल्यात घंटागाड्यांचा लवाजमा; कचरा जैसे थे!

अकोल्यात घंटागाड्यांचा लवाजमा; कचरा जैसे थे!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरातील कचऱ्याची समस्या निकाली काढण्यासाठी मनपाच्या मोटार वाहन विभागात वाहनांचा अक्षरश: लवाजमा दिसून येतो. नागरिकांच्या घरोघरी जाऊन कचरा जमा करण्यासाठी घंटागाडी तसेच सर्व्हिस लाइन, सार्वजनिक ठिकाणांवर साचलेला कचरा उचलण्यासाठी तब्बल ५० ट्रॅक्टरचा वापर केला जात असतानाही कचºयाचे ढीग कायमच दिसून येतात. मोटरवाहन विभागावर राजकारणी व मनपा पदाधिकाऱ्यांचे नियंत्रण असल्यामुळे वाहनांच्या इंधनावर कोट्यवधी रुपयांची उधळण सुरू असल्याची माहिती आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठ, सर्व्हिस लाइन, सार्वजनिक ठिकाणांवर बाराही महिने कचºयाचे ढीग साचून असल्याचे किळसवाणे चित्र पाहावयास मिळते. पावसाळ्यात साचलेल्या कचºयामुळे दुर्गंधी पसरून अकोलेकरांना विविध साथीच्या आजारांना बळी पडावे लागत आहे. त्यामुळे की काय, शहराच्या गल्लीबोळातील खासगी हॉस्पिटल्स व क्लिनिकमध्ये बाराही महिने विविध आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांची गर्दी दिसून येते. अकोलेकरांच्या आरोग्याला घातक असलेल्या कचºयाच्या समस्येसाठी प्रशासनाइतकेच सत्ताधारी पक्ष तसेच विरोधी पक्षही जबाबदार असल्याचा आरोप नेहमीच केला जातो. कचºयाची समस्या निकाली काढण्यासाठी महापालिकेला शासनाकडून प्राप्त कोट्यवधी रुपयांचा अक्षरश: चुराडा केला जात आहे.
त्यामध्ये प्रामुख्याने मोटार वाहन विभागामार्फत ट्रॅक्टर, घंटागाडी व पोकलेन मशीनच्या इंधनापोटी खर्च होणाºया कोट्यवधी रुपयांचा समावेश आहे.


कचºयाची वाहतूक करण्यासाठी ५० ट्रॅक्टर
शहरातील मुख्य बाजारपेठ, सर्व्हिस लाइन तसेच सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा उचलण्यासाठी मनपाच्या मालकीचे १६ ट्रॅक्टर आहेत. मनपा क्षेत्राची हद्दवाढ झाल्याची सबब पुढे करीत तब्बल ३४ ट्रॅक्टर भाडेतत्त्वावर घेण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त नागरिकांच्या घरोघरी जाऊन कचरा जमा करण्यासाठी १२५ वाहनांची खरेदी करण्यात आली होती. त्यापैकी ११८ वाहने दैनंदिन कचरा जमा करतात. तरीही उघड्यावरील कचºयाची समस्या कायम आहे, हे विशेष.

Web Title: Garbage problem continue in Akola city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.