शिक्षकांनी फुलवीली उजाड माळरानावर बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 11:09 AM2020-10-23T11:09:57+5:302020-10-23T11:10:29+5:30

Telhara News परिसरात पिंपळेश्वर हनुमान मंदीर सुशोभीकरण करण्यात आल्याने भक्तगण संख्या वाढती दिसत आहे.

The garden on the deserted flurish by the teachers | शिक्षकांनी फुलवीली उजाड माळरानावर बाग

शिक्षकांनी फुलवीली उजाड माळरानावर बाग

Next

- सत्यशील सावरकर

तेल्हारा -  येथील प्रबोधन काॅलनी लगत असलेल्या यश नगर पिंपळेश्वर हनुमान मंदिर परिसरात यश नगर मधील रहिवाशी यांनी आपल्या मेहनतीने उजाळ माळरानावर बाग फुलवली आहे.
तेल्हारा शहरातील प्रबोधन काॅलनी लगत असलेल्या गाडेगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या यश नगरमधे सुरूवातीला जेमतेम चार-पाच घर दिसत होती. नगर झाले परंतु रहिवासी जेमतेम असल्याने सर्व परिसर उजाड माळराना सारखा दिसत होता. नगराच्या मधोमध खुल्या प्लाॅट मध्ये पिंपळेश्वर हनुमान मंदीर उभारले होते ते सुद्धा बाभळी काट्या नी वेढले होते. या परिसरात आपल्या चार-पाच लोकांशिवाय कोणी येत नाही.  चित्रकार सानप  परिसर चित्र काढून आपली वेळ निभावत होते. तर निलेश घाटोळ , महादेवराव भेंडेकर,वैभव सरोदे, अतुल देव या मेहनती  शेतकरी कुटुंबातील मुळ रहिवासी नागरिकांनी या उजाड राणावर नांगर फिरवून कायापालट करण्याचा विडा उचलला.  त्यांच्या या सेवाभावी कार्याने प्रेरीत होऊन दर्शनासाठी जाणारे गजानन नेमाडे सर, साबळे सर, दादासाहेब यांनी सुद्धा हिरारीने सहभागी त्यांच्या मेहनतीला जोड दिली आणि उजाड माळरानी बाग फुलविली आज यश नगर येथील परिसरात पिंपळेश्वर हनुमान मंदीर सुशोभीकरण करण्यात आल्याने भक्तगण संख्या वाढती दिसत आहे. यश नगर मधील रहिवाशी यांनी घेतलेली हि निस्वार्थ सेवा डोळ्यात भरणारी व कौतुकास्पद नक्कीच आहे.

Web Title: The garden on the deserted flurish by the teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.