कृषी प्रदर्शनात माठावरील मांड्याची लज्जतच न्यारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 02:06 AM2017-12-28T02:06:45+5:302017-12-28T02:08:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: बचत गटांनी विविध दालने उघडली असून यामध्ये ‘माठावरचा मांडा’ आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरत आहे. तसेच या कृषी प्रदर्शनास खमंग आणि चवदार बनविले. हळद व कवठाचे लोणचे, कवठाची चटणी, सोया कुकीज, थेट शेतकर्यांकडून निर्मित सेंद्रिय मध, आवळा चॉकलेट, क्यांडी, आवळा लोणचे, निंबू लोणचे, मिरची लोणचे तसेच मूग, उडीद, ज्वारी असा कृषी उत्पादित व मूल्यवर्धित माल घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी उसळली.
रेशीम निर्मिती, शेत तलावातील मत्स्यपालन, कुक्कुटपालनाचे प्रात्यक्षिक कुक्कुटपालनासाठी उपयोगी असल्याने शेतकर्यांनी याकडे लक्ष केंद्रित केले. यावर्षी महाराष्ट्र राज्य पशू विज्ञान व मत्स्य विद्यापीठाच्या स्थानिक पदव्युत्तर संशोधन संस्थेच्यावतीने सर्वच प्रकारच्या पशू, पक्ष्यांची माहिती देण्यासाठी आकर्षक दालन उघडले. शेतकर्यांची ही माहिती जाणून घेतली.