बार्शीटाकळी तालुक्यातील वडगावात गॅस सिलिंडरचा भडका; अनर्थ टळला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 01:52 AM2018-03-05T01:52:57+5:302018-03-05T01:52:57+5:30
अकोला : बार्शीटाकळी तालुक्यातील वडगावात ४ मार्चच्या रात्री एका घरात गॅस सिलिंडर, शेगडी व रेग्युलेटरने पेट घेतला होता. या घटनेबाबत माहिती मिळताच पिंजर येथील संत गाडगे महाराज आपत्कालीन शोध व बचाव पथकाने अवघ्या १० मिनिटात घटनास्थळी पोहोचून भडकलेली शेगडी, सिलिंडर व रेग्युलेटर विझवून आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बार्शीटाकळी तालुक्यातील वडगावात ४ मार्चच्या रात्री एका घरात गॅस सिलिंडर, शेगडी व रेग्युलेटरने पेट घेतला होता. या घटनेबाबत माहिती मिळताच पिंजर येथील संत गाडगे महाराज आपत्कालीन शोध व बचाव पथकाने अवघ्या १० मिनिटात घटनास्थळी पोहोचून भडकलेली शेगडी, सिलिंडर व रेग्युलेटर विझवून आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
वडगाव येथील विनोद सीताराम निलखन यांच्या घरातील गॅस सिलिंडर, शेगडी व रेग्युलेटरने ७.३० वाजताच्या सुमारास भडका घेतला होता. या घटनेने वडगावात प्रचंड खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती कळताच पिंजरच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे त्यांच्या सहकाºयांसह अवघ्या १० मिनिटात तेथे पोहोचले. त्यांनी जीव धोक्यात घालून घरातील पेटलेले गॅस सिलिंडर आग लागलेल्या घरातून काढून सुरक्षितस्थळी नेऊन विझवले. गॅस कनेक्शनची प्रथम शेगडी विझवली. त्यानंतर पेटलेली नळी ओढून रेग्युलेटरसह पेटलेले सिलिंडर उचलून गावाबाहेर मोकळ्या सुरक्षित जागेत नेऊन ठेवले. तेथे पेटलेले रेग्युलेटर विझवून नंतर सिलिंडर सुरक्षितपणे बंद केले. दीपक सदाफळे यांच्या धाडसी रेस्क्यू आॅपरेशनमुळे पुढील भीषण अनर्थ टळला, हे विशेष.
या घटनेत पेटलेले गॅस कनेक्शन हे विनोद निलखन यांच्या घराच्या आतील खोलीत होते. विशेष म्हणजे यावेळी घरातील देव्हाºयात दिवे लागलेले होते. आग लागलेल्या घराच्या आजूबाजूला अंदाजे १०० मीटर क्षेत्रातील सर्व लोकांना आपापल्या घरातील गॅस कनेक्शन बंद करून घेऊन सर्वांना सुरक्षितस्थळी तत्काळ जाण्याबाबत दीपक सदाफळे यांनी सांगितले. गावकºयांना आपापल्या घरातील महत्त्वपूर्ण कागदपत्रे, दाग-दागिने, वाहन घेऊन लहान मुले, वयोवृद्ध लोकांसह बाजूच्या मंदिरात सुरक्षितस्थळी जाण्यासाठी विनंती केली. या गावात घराला घरे लागूनच होती. त्यामुळे आगीच्या संपर्कात येणारे साहित्य आणि आगीचे स्वरूप वाढविण्यास कारणीभूत होणाºया सर्व वस्तू आगीच्या संपर्कात येण्याच्या आधीच दीपक सदाफळे, उल्हास आटेकर, गौरव जवके यांनी सुरक्षितस्थळी हलविल्या.
संपूर्ण गावाने अनुभवला थरार!
वडगावातील या गॅस सिलिंडर, शेगडी व रेग्युलेटर पेटल्याने घडलेल्या घटनेचा थरार संपूर्ण गावाने अनुभवला. संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने तातडीने पोहोचून राबविलेल्या मोहिमेमुळे मोठी जीवित हानी व वित्त हानी टळली, हे विशेष.
दोन तासांपर्यंत चालली रेस्क्यू मोहीम!
या धाडसी कारवाईत संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांच्यासोबत त्यांचे सहकारी उल्हास आटेकर, गौरव जवके यांनी ही धाडसी रेस्क्यू मोहीम फत्ते केली. ही मोहीम दोन तासांपर्यंत चालली.