बाळापूरजवळ गॅस टॅँकर दुसर्‍या टॅँकरवर आदळला : मोठी दुर्घटना टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 07:36 PM2017-12-24T19:36:15+5:302017-12-25T02:17:20+5:30

बाळापूर: खड्डा चुकवण्यासाठी टॅँकरने ब्रेक लावल्याने मागून येत असलेला टॅँकर त्यावर आदळला.  अपघातानंतर गॅसने भरलेल्या टॅँकरने पेट घेतला. सुदैवाने ही आग टॅँकरच्या कॅबिनपर्यंतच र्मयादित  राहिल्याने मोठी दुर्घटना टळली. बाळापूरच्या शासकीय आयटीआयसमोर रविवारी दुपारी ३.३0  वाजताच्या सुमारास घडलेल्या या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील वाहतुक दोन्ही  बाजूने थांबविण्यात आली होती. 

Gas tanker near Balapur was hit by another tanker: A major accident was avoided | बाळापूरजवळ गॅस टॅँकर दुसर्‍या टॅँकरवर आदळला : मोठी दुर्घटना टळली

बाळापूरजवळ गॅस टॅँकर दुसर्‍या टॅँकरवर आदळला : मोठी दुर्घटना टळली

googlenewsNext
ठळक मुद्देअपघातग्रस्त टॅँकरने घेतला पेटखड्डे चुकवताना घडला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
बाळापूर : खड्डा चुकवण्यासाठी टॅँकरने ब्रेक लावल्याने मागून येत असलेला टॅँकर त्यावर आदळला.  अपघातानंतर गॅसने भरलेल्या टॅँकरने पेट घेतला. सुदैवाने ही आग टॅँकरच्या कॅबिनपर्यंतच र्मयादित  राहिल्याने मोठी दुर्घटना टळली. बाळापूरच्या शासकीय आयटीआयसमोर रविवारी दुपारी ३.३0  वाजताच्या सुमारास घडलेल्या या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील वाहतुक दोन्ही  बाजूने थांबविण्यात आली होती. 
राष्ट्रीय महामार्ग ६ वरील शासकीय आयटीआयसमोरून दोन टँकर एकामागोमाग जात होते.  दरम्यान, समोरच्या टॅँकर चालकाने रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात ब्रेक टॅँकरचे  अचानक ब्रेक लावले. त्यामुळे, मागून येत असलेल्या गॅस टॅँकर क्र.एम. एच. ४३ सी जी २३९६ ने  समोरच्या टॅँकरला जबर धडक दिली. या अपघातामुळे गॅसने भरलेल्या टॅँकरने पेट घेतला. या  आगीत टॅँकरची कॅबिन पूर्ण जळाली. सुदैवाने ही आग गॅसपर्यंत पोहचली नाही. अन्यथा मोठी  दुर्घटना घडली असती. घटनेची माहिती मिळताच बाळापूर नगरपालिका व अकोला महानगर  पालिकेच्या अग्निशमन बंबांनी घटनास्थळावर धाव घेऊन आग विझवली. या अपघातामुळे  महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. तसेच पेट घेतलेल्या टॅँकरमध्ये गॅस भरलेला  असल्याने पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक बाळापूर शहरातून वळवली होती. 

Web Title: Gas tanker near Balapur was hit by another tanker: A major accident was avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.