पातुरचा गावरान आंबा अक्षय तृतीयेपासून उपलब्ध होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:18 AM2021-04-07T04:18:52+5:302021-04-07T04:18:52+5:30
एकेकाळी ५० हजारांपेक्षा अधिक आंब्याची झाडे असलेला हा परिसर आमराई म्हणून बघायला मिळायचा. मात्र आता केवळ काळाच्या ओघात शेतकऱ्याचे ...
एकेकाळी ५० हजारांपेक्षा अधिक आंब्याची झाडे असलेला हा परिसर आमराई म्हणून बघायला मिळायचा. मात्र आता केवळ काळाच्या ओघात शेतकऱ्याचे अर्थचक्र बिघडल्यामुळे केवळ तीन ते चार हजार आंब्याचे झाडेच उरली आहेत. येथील गजानन निलखन हे गावरान गोड आंब्याची कलमे तयार करून ती पुन्हा शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध करून देत आहेत. पातूर, शिर्ला, नांदखेडच्या प्रामुख्याने रोडग्या, पिठोरी, सुनील गिर्हे यांचा गोड्या, पातूरच्या अत्तकारीतील केळ्या, लाळू, पट्टे आमराईतील बंशीशेठ निमकंडेचा वारुळ्या, कसांड्या, मळसुरेंच्या गवाहीतला पेढ्या, तोरंबी, अनंतराव परमाळेचा संतऱ्या, अखज्या, किसनराव ऊगलेचा वारूया, गावरान केशर आदी गावरान आंबे यावर्षी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. गावरान आंब्याच्या रसासोबत मांडे खाण्याची यावर्षी रेलचेल राहणार आहे. खवैय्यांसाठी पिकलेला गोड रसरशीत गावरान आंबा अक्षय तृतीयेला बाजारपेठेत उपलब्ध होत आहे.