मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती करा!

By admin | Published: September 25, 2014 02:49 AM2014-09-25T02:49:12+5:302014-09-25T02:49:12+5:30

निवडणूक निरीक्षक आशिष गोयल यांचे निर्देश.

Generate awareness to increase voting percentage! | मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती करा!

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती करा!

Next

अकोला: विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती करण्याचे निर्देश निवडणूक निरीक्षक आशिष गोयल यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या अधिकार्‍यांच्या बैठकीत दिले.
गोयल यांनी जनजागृतीविषयक कामाचा आढावा घेतला. यावेळी प्रामुख्याने जिल्हाधिकारी अरुण शिंदे, मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डी.एस. बचुटे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक ) उदय राजपूत, उ पजिल्हाधिकारी (महसूल) प्रमोद देशमुख, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी तथा अकोला पूर्व म तदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रा.संजय खडसे, जिल्हा माहिती अधिकारी योगिराज पाटील उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात म तदानाची टक्केवारी ७५ टक्क्यांवर पोहोचेल, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्याच्या सूचना निवडणूक निरीक्षक गोयल यांनी दिल्या. विविध शासकीय-निमशासकीय कार्यालयांसह शाळा- महाविद्यालयांमध्ये मतदार जागृतीविषयक भिंतीपत्रके, फलक व इतर प्रकारच्या उपक्रमांद्वारे जनजागृतीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Generate awareness to increase voting percentage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.