अकोल्यात ३ हजार ३00 वृक्षांचे ‘जिओ टॅगिंग’
By admin | Published: July 2, 2016 12:53 AM2016-07-02T00:53:05+5:302016-07-02T00:53:05+5:30
अकोला महापालिकेचा दावा;प्रशासनासह स्वयंसेवी संस्थांचा उत्स्फुर्त सहभाग.
अकोला:पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड हा एकमेव पर्याय असून त्याअनुषंगाने महापालिका क्षेत्रात वृक्षारोपणाची मोहिम राबवण्यात आली. प्रशासनाच्यावतीने शुक्रवारी शहराच्या विविध भागात ३ हजार ३00 वृक्षांची लागवड करण्यात आली असून ह्यजीपीएसह्ण प्रणालीद्वारे ह्यजिओ टॅगिंगह्णकरून त्यांची नोंद घेण्यात आली.
झाडांची बेसुमार कत्तल होत असल्याचे दुष्परिणाम समोर येत आहेत. जंगले नष्ट होत असतानाच त्यातुलनेत वृक्षारोपण होत नसल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. ही बाब केंद्रासह राज्य शासनाने गंभीरतेने घेत १ जुलै ते ७ जुलै पर्यंत वृक्ष लागवड मोहिम व्यापक प्रमाणात राबवण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत. महापालिका प्रशासनाने समाजसेवी संस्था, मनपा शाळांचे शिक्षक,कर्मचार्यांसह सर्वपक्षीय नगरसेवकांना वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. प्रशासनाच्या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे शुक्रवारी शहरात पहावयास मिळाले. प्रशासनाने शहराच्या विविध भागात ५ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवले होते. राजकीय पदाधिकारी,नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, मनपा शिक्षकांना देण्यात आलेल्या प्रत्येक वृक्षाची ह्यजीपीएसह्णप्रणालीद्वारे ह्यजिओ टॅगिंगह्णकरून नोंद घेण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून होत आहे. ही नोंद संगणकीकृत करून छायाचित्रांसह त्याची माहिती शासनाच्या वेबसाईटवर ह्यअपलोडह्णकरण्याचे काम प्रशासकीय स्तरावर सुरु झाले आहे.
आता वृक्ष जगवण्याचे आव्हान
वृक्षारोपण केल्यानंतर त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी अकोलेकर या नात्याने सर्वांवरच आहे. तरच वृक्ष लागवडीची मोहिम खर्या अर्थाने सार्थकी लागेल. यापूर्वीचा वृक्ष लागवडीचा अनुभव पाहता, केवळ तीन ते चार टक्के वृक्षांचे संगोपन होत असल्याचे दिसून येते.
वृक्ष लागवडीची होणार तपासणी
महापालिकेने स्वयंसेवी संस्था, पालिका शिक्षकांसह नगरसेवकांना वाटप केलेल्या वृक्षांची लागवड केली किंवा नाही,याची तपासणी होणार आहे. तपासणीसाठी शासनस्तरावरून पथकाचे गठन केले जाणार असल्याची माहिती आहे.