आता मिळणार डिजिटल विमा पॉलिसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:17 AM2021-02-15T04:17:45+5:302021-02-15T04:17:45+5:30
यंदाच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तसेच केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे विमा पाॅलिसीच्या मुद्द्यावर केंद्रीय राज्यमंत्री ...
यंदाच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तसेच केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे विमा पाॅलिसीच्या मुद्द्यावर केंद्रीय राज्यमंत्री ना. संजय धाेत्रे यांनी पत्रव्यवहार केला हाेता. पाॅलिसीधारकांनी विमा काढल्यानंतर काही वर्षांनंतर त्यांना विमा कार्यालयात तांत्रिक अडचणी येतात. अशा अडचणींची साेडवणूक याेग्यरीत्या हाेत नसल्यामुळे पाॅलिसीधारकांना नाहक त्रास सहन करावा लागताे. या सर्व बाबी लक्षात घेता केंद्रीय राज्यमंत्री ना.धाेत्रे यांनी विमा प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात देण्यासाेबतच विमा प्रमाणपत्राला डीजी लाॅकरची सुविधा देण्याची मागणी त्यांनी केली हाेती. यासंदर्भात सरकारने परिपत्रक काढून विमा कंपन्यांना डीजी लॉकरमार्फत डिजिटल विमा पॉलिसी देण्याचे आदेश दिले आहेत. भारतीय विमा नियामक प्राधिकरणच्या वतीने ९ फेब्रुवारी २०२१च्या परिपत्रकाचे पालन करण्याचे निर्देश सर्व विमा कंपन्यांना दिले आहेत.
...फाेटाे,ना.संजय धाेत्रे...