कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मान्सूनपूर्व तयारी करून आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज रहा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:18 AM2021-05-19T04:18:53+5:302021-05-19T04:18:53+5:30

यंदाची मान्सूनपूर्व तयारी करत असताना कोरोना संसर्गाच्या स्थितीचे भान राखून करावयाची आहे. आगामी काळात कोरोना संसर्ग फैलावणार नाही ...

Get ready for disaster management by preparing for the monsoon against the backdrop of Corona! | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मान्सूनपूर्व तयारी करून आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज रहा !

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मान्सूनपूर्व तयारी करून आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज रहा !

Next

यंदाची मान्सूनपूर्व तयारी करत असताना कोरोना संसर्गाच्या स्थितीचे भान राखून करावयाची आहे. आगामी काळात कोरोना संसर्ग फैलावणार नाही याबाबतच्या उपाययोजना कायम ठेवून, आपत्ती व्यवस्थापनाची तयारी करावयाची आहे. त्यासाठी कोणत्याही कोविड रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित होऊन उपचार सुविधेत बाधा निर्माण होणार नाही, याची दक्षता वीज वितरण कंपनीने घ्यावयाची आहे. त्याचप्रमाणे ऑक्सिजन रिफिलिंग प्लांटचे कामही अव्याहतपणे सुरु राहिल, यासाठी वीजपुरवठा सुस्थापित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या.

पूल, सिंचन प्रकल्पांची तपासणी करा!

जिल्ह्यातील सर्व जुन्या आणि नवीन पुलांची तपासणी करण्याचे सांगत , पाटबंधारे विभागाने सर्व लहान-मोठ्या सिंचन प्रकल्पांच्या स्थितीची प्रत्यक्ष तपासणी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. पूर व्यवस्थापनासाठी नदी काठावरील तसेच पूरप्रवण गावांमध्ये संपर्क यंत्रणा व खबरदारीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

वैद्यकीय सुविधांचा ॲक्शन प्लॅन तयार करा!

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विविध साथींच्या आजारांच्या उपचारासाठी वैद्यकीय सुविधांचा ॲक्शन प्लॅन तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आरोग्य विभागाला या बैठकीत दिले.

नालेसफाईची कामे तातडीने पूर्ण करा!

जिल्ह्यातील शहरी भागासह महानगरपालिका हद्दीतील नाले सफाईची कामे तातडीने पूर्ण करुन कुठेही पाणी तुंबणार नाही याची खातरजमा करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. नदी पात्र आणि नाल्यातील अतिक्रमणे तातडीने अतिक्रमणे हटविण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. आपत्ती निवारणासाठी शोध व बचाव पथकाच्या सदस्यांना साहित्य वाटप करण्याच्या सूचनाही या बैठकीत दिल्या.

Web Title: Get ready for disaster management by preparing for the monsoon against the backdrop of Corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.