घरफाेडीतील आराेपीला चार दिवसांची पाेलिस काेठडी
By आशीष गावंडे | Published: May 7, 2024 11:58 PM2024-05-07T23:58:14+5:302024-05-07T23:58:25+5:30
पाेलिसांसमाेर फरार आराेपींचा शाेध घेण्याचे आव्हान
अकाेला: सहकार नगरमधील उद्याेजक ब्रिजमाेहन भरतीया यांच्याकडे घरफाेडी करणारा आराेपी जिगर कमलाकर पिंपळे याला खदान पाेलिसांनी मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला चार १० मे पर्यंत पाेलिस काेठडी सुनावण्यात आली. दरम्यान, या धाडसी घरफाेडीत आणखी काही अट्टल गुन्हेगारांचा समावेश असून त्यांचा शाेध घेण्याचे पाेलिसांसमाेर आव्हान ठाकले आहे.
गाेरक्षण मार्गावरील सहकार नगरस्थित उद्याेजक ब्रिजमाेहन भरतीया यांच्या बंगल्यात शिरुन चाेरट्यांनी साेन्या चांदीच्या दागिन्यांसह काही राेख रक्कम अशा एकूण ४४ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना ३ मे राेजी मध्यरात्री घडली हाेती. हा प्रकार ४ मे राेजी सकाळी भरतिया कुटुंबियांच्या निदर्शनास आल्यानंतर या घटनेला वाचा फुटली. या प्रकरणी खदान पाेलिसांनी अज्ञात आराेपींविराेधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला हाेता. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेतील पाेलिसांनी ४८ तासांत छडा लावत अहमदनगर जिल्ह्यातून आराेपी जिगर कमलाकर पिंपळे (३७,रा.पाखाेरा,ता.गंगापूर,जि.छत्रपती संभाजीनगर) याला ६ मे राेजी अटक केली. त्याला साेमवारी रात्री खदान पाेलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर खदान पाेलिसांनी आराेपी जिगर पिंपळे याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला १० मे पर्यंत पाेलिस काेठडी सुनावण्यात आली.
फरार आराेपींमध्ये अट्टल गुन्हेगारांचा समावेश
घरफाेडी करणारे सर्व आराेपी अट्टल गुन्हेगार असून चाेऱ्या,दराेडा घालणे, लुटमार करण्याचा आराेपींचा वंशपरंपरागत व्यवसाय असल्याची माहिती आहे. या घटनेतील आराेपी माेबाइलचा वापर करीत नसल्यामुळे त्यांचा शाेध घेऊन त्यांना पकडण्याचे पाेलिसांसमाेर आव्हान ठाकले आहे.