छेडखानीची तक्रार देण्यासाठी आलेल्या मुलीला रात्रभर ठेवले बसवून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:20 AM2021-07-30T04:20:25+5:302021-07-30T04:20:25+5:30

राज्यात व देशात घडणाऱ्या छेडखानीच्या तसेच महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांबाबत केंद्र व राज्य सरकार अत्यंत गंभीर आहे. अशा ...

The girl who came to report the harassment was kept up all night! | छेडखानीची तक्रार देण्यासाठी आलेल्या मुलीला रात्रभर ठेवले बसवून!

छेडखानीची तक्रार देण्यासाठी आलेल्या मुलीला रात्रभर ठेवले बसवून!

Next

राज्यात व देशात घडणाऱ्या छेडखानीच्या तसेच महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांबाबत केंद्र व राज्य सरकार अत्यंत गंभीर आहे. अशा घटना घडू नयेत यासाठी सरकारकडून कठोर पावले उचलली जात आहेत. मात्र असे असताना अकोला जिल्ह्यातील चान्नी पोलिसांना मात्र अशा घटनांबाबत अजिबात गांभीर्य नसल्याचे दिसून आले.

आलेगाव येथील एक अल्पवयीन मुलगी तिच्या आईसोबत मंदिरात दर्शनाला गेली होती. मंदिरातून दर्शन करून घरी परत जात असताना या मुलीच्या घराजवळच राहणाऱ्या २९ वर्षीय विवाहित युवकाने तिचा पाठलाग करून मुलीसोबत बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु मुलीने त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याने तिच्या केसांना पकडून झटका दिला. मुलीच्या आईचे लक्ष गेल्याने आरोपी तेथून पळून गेला.

या घटनेची तक्रार संबंधित अल्पवयीन मुलीने चान्नी पोलिसात नोंदविली आहे. तिच्या तक्रारीनुसार पोलिसांनी भादंवि कलम ३५४, ड, बालकाचे लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा ११, १२ नुसार गुन्हा दाखल केला. परंतु या अल्पवयीन मुलीची तक्रार नोंदवून घेण्यासाठी पोलिसांनी तिला व तिच्या आई-वडिलांना रात्रभर पोलीस ठाण्यात ताटकळत बसवून ठेवले.

चान्नी पोलिसांचा बेजबाबदार कारभार

चान्नी पोलिसांना महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांचे अजिबात गांभीर्य नसल्याचा आराेप नागरिकांकडून होत आहे. अल्पवयीन मुलीची छेडखानी करणाऱ्यावर कारवाई व्हायलाच हवी, त्याचबरोबर अशा घटनांबाबत एवढा बेजबाबदारपणा दाखविणाऱ्या चान्नी पोलिसांना सुद्धा वरिष्ठांकडून योग्य समज मिळायला हवी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

Web Title: The girl who came to report the harassment was kept up all night!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.