आई-वडिलांपेक्षा 'तिला' वाटले 'पियाचेच घर प्यारे'; प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीचा आई-वडिलांना भेटण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 02:28 PM2018-07-28T14:28:10+5:302018-07-28T14:46:14+5:30
अकोला : मुलीला जिवापाड जपत, तिचा सांभाळ करणाऱ्या आई-वडिलांच्या १८ वर्षाच्या प्रेमाला झिडकारत, मुलीने सहा महिन्यांपूर्वी केलेल्या प्रेमाचा स्वीकार केला. आई-वडिलांपेक्षा तिला पियाचेच घर प्यारे वाटले.
Next
ठळक मुद्देखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात राहणारी १८ वर्षीय युवती शेजारी एका युवकाच्या प्रेमात पडली. शुक्रवारी सकाळी युवती प्रियकरासोबत लग्न करून आणि सर्व कागदपत्रांची पूर्तता करून पोलीस ठाण्यात हजर झाली. पोलिसांनी तिच्या आई-वडिलांना ठाण्यात बोलावून घेतल्यावर त्यांना धक्काच बसला.
<p>अकोला : मुलीला जिवापाड जपत, तिचा सांभाळ करणाऱ्या आई-वडिलांच्या १८ वर्षाच्या प्रेमाला झिडकारत, मुलीने सहा महिन्यांपूर्वी केलेल्या प्रेमाचा स्वीकार केला. आई-वडिलांपेक्षा तिला पियाचेच घर प्यारे वाटले. एवढेच नाही, तर आई-वडिलांनी मुलीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली; परंतु प्रेमात बेधुंद झालेल्या १८ वर्षीय युवतीने त्यांच्यासोबत बोलण्यास, भेटण्यास नकार दिल्याचा प्रकार खदान पोलीस ठाण्यात शुक्रवारी दुपारी घडली.खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात राहणारी १८ वर्षीय युवती शेजारी एका युवकाच्या प्रेमात पडली. चोरून भेटीगाठी सुरू झाल्या. आई-वडिलांनी तिच्यावर विश्वास टाकला. परंतु, त्या विश्वासाला तडा देऊन युवतीने कोणालाही न सांगता, घरातून पळ काढला. मुलगी रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने, चिंतेत पडलेल्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. अखेर मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांनी आठ दिवसांपूर्वी खदान पोलीस ठाण्यात दिली. शुक्रवारी सकाळी युवती प्रियकरासोबत लग्न करून आणि सर्व कागदपत्रांची पूर्तता करून पोलीस ठाण्यात हजर झाली. पोलिसांनी तिच्या आई-वडिलांना ठाण्यात बोलावून घेतल्यावर त्यांना धक्काच बसला. त्यांनी मुलीसोबत बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु, मुलगी दोन दिवसाच्या प्रेमासमोर आई-वडिलांशी बोलायलाही महाग झाली. शेवटी आई-वडिलांनी जड अंत:करणाने पोलीस ठाण्यातून पाय काढता घेतला. एवढं वर्ष दिलेलं प्रेम, केलेला सांभाळ याची आठवणही त्या मुलीला राहिली नाही. प्रेमात आंधळ्या झालेल्या मुलीला आई-वडिलांचं प्रेम दिसत नव्हतं. दिसत होतं ते फक्त प्रियकराचे चार दिवसांचे प्रेम. मुलगी सज्ञान असल्याने, पोलिसांनाही मुलीचीच बाजू घ्यावी लागली. पोलीस आई-वडिलांना वारंवार सांगत होते, आम्ही काहीच करू शकत नाही, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)