सुवर्ण पदकांत मुलींचीच बाजी!

By admin | Published: February 6, 2017 02:40 AM2017-02-06T02:40:13+5:302017-02-06T02:40:13+5:30

कृषी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ;यावर्षी सुवर्ण पदकांत मुलींनी बाजी मारली.

Girls medal in gold medal! | सुवर्ण पदकांत मुलींचीच बाजी!

सुवर्ण पदकांत मुलींचीच बाजी!

Next

अकोला, दि. ५- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३१ व्या दीक्षांत समारंभात रविवारी एकूण २,५९३ स्नातकांना निरनिराळ्या विषयात पदव्या प्रदान करण्यात आल्या आहेत. यामध्ये २६ सुवर्ण, १४ रौप्य व इतर रोख पुरस्काराचा समावेश आहे. यावर्षी सुवर्ण पदकांत मुलींनी बाजी मारली.
पदवी प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये बी.एस्सी (कृषी) १७७४, उद्यान विद्या १२९, वन विद्या ३१, कृषी जैव तंत्रज्ञान ६६, कृषी व्यवसाय व्यवस्थापन ४५, अन्नशास्त्र ७७, बी.टेक (कृषी अभियांत्रिकी) ९३, पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्याशाखा मध्ये एम.एस्सी (कृषी) २६१, उद्यान विद्या ३६, वनविद्या १0, कृषी अभियांत्रिकी २२, एम.बी.ए. (कृषी) २१, पीएच.डी २८ आदींचा समावेश आहे. यावर्षीसुद्धा मुलींनी बाजी मारीत नागपूर कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आगा तबस्सुम मकबूल हिला एकूण सहा पदके मिळाली. यामध्ये ५ सुवर्ण व १ रौप्य पदकाचा समावेश आहे. मुलांमध्ये गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल आणि नक्षलप्रभावित क्षेत्रातील कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी आदित्य भास्कर घोगरे यानेसुद्धा ३ सुवर्ण, १ रौप्य व २ रोख परितोषिकासह एकूण ६ पदके प्राप्त केली. या विद्यापीठातील सर्वच महाविद्यालयातील तो सर्वोत्तम असल्याचे त्याने सिद्ध केले, तर पदव्युत्तर शिक्षण संस्था अकोलाचा विद्यार्थी विकास रामटेके याने ३ सुवर्ण व २ रोख परितोषिकासह एकूण ५ पदके मिळविली. कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा मनजित पाठक यानेसुद्धा एकूण ५ पदके प्राप्त केली. यासह एकूण ३0 विद्यार्थ्यांनी एकूण ५९ पदके प्राप्त केली.
चार उत्कृष्ट शिक्षक, ८ उत्कृष्ट संशोधक, २ उत्कृष्ट कर्मचारी व १ उत्कृष्ट संशोधन परितोषिक यांचा समावेश आहे, अशा प्रकारे एकूण ४५ विद्यार्थी व अधिकार्‍यांनी ७६ पदके प्राप्त केली.
उत्कृष्ट शिक्षकामध्ये डॉ.एस.आर. पोटदुखे, डॉ.पी.पी. वानखडे, डॉ.एस.के. ठाकरे, डॉ. मेघा डहाळे, उत्कृष्ट संशोधक डॉ.ई.आर. वैद्य, डॉ.एस.एन. देशमुख, डॉ.एस.एस. निचळ, एस.बी. खरात, डॉ.पी.एन. माने, डॉ.पी.एच. बकाने, डॉ. प्रदीप बोरकर, डॉ. महेंद्र नागदेवे, अभियांत्रिकी शाखेतून डॉ. समीत कुमार नंदी तर उत्कृष्ट कर्मचारी म्हणून एस.जी. सूर्यवंशी, एस.आर. बोदडे यांचा समावेश आहे.
पीएच.डी. प्राप्त केलेल्यांमध्ये श्यामकुमार मुंजे, सोनाली आवारे, जया तुमदाम, रविराज उदासी, अतुल गावंडे, विनोद नागदेवते, उज्ज्वला गावंडे, संजीव बंतेवाड, कविता चोपडे, प्राजक्ता मेटकरी, दीपाली बोरकर, मदन वांढरे, रवींद्र नैताम, संजीव नागे, अरविंद मकेसर, राजेंद्र वानखडे, शिवाजी यादलखेड, अभय वाघ, सिद्धेश्‍वर सावंत, अरविंदकुमार सोनकांबळे, प्रिया गावंडे, प्रमोद बकाने, मितल सुपे, सुशीलकुमार बनसुडे यांचा समावेश आहे.

Web Title: Girls medal in gold medal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.