अकोल्यात मुलींची बाजी; जिल्ह्याचा निकाल ८८ टक्के
By atul.jaiswal | Published: May 30, 2018 03:13 PM2018-05-30T15:13:47+5:302018-05-30T15:48:03+5:30
अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत अकोला जिल्ह्याचा निकाल ८८. ३२ टक्के लागला आहे.
अकोला : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत अकोला जिल्ह्याचा निकाल ८८. ३२ टक्के लागला आहे. यामध्ये मुलींनी बाजी मारली असून, मुलींच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९२.४६ टक्के एवढी आहे.
जिल्ह्यात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी २५ हजार ७२७ नियमित विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली होती. त्यापैकी २५ हजार ७०४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी २२ हजार ७०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ८८.३२ अशी आहे. उत्तीर्ण २५ हजार ७२७ विद्यार्थ्यांमध्ये ११५२५ मुले व १११७६ मुली आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८४.६४ तर मुलींची टक्केवारी ९२.४६ अशी आहे. मागील वर्षीप्रमाणे यावषीर्ही मुलींनी निकालात मुलांपेक्षा जास्त टक्केवारी मिळवित बाजी मारली. जिल्ह्यात सर्वाधिक निकाल अकोला तालुक्याचा ८९.८० टक्के लागला आहे. त्या खालोखाल बार्शीटाकळी तालुका ८९.३० टक्के, पातूर तालुका ८८.८६ टक्के, मुर्तीजापूर तालुका ८८.८६ टक्के, अकोट तालुका ८७.९७ टक्के , बाळापूर तालुका ८५.३९ टक्के तर तेल्हारा तालुक्याचा निकाल सर्वात कमी अर्थात ८४.७५ टक्के लागला आहे.