‘सीबीएसई’ बारावीच्या परीक्षेत मुलींची बाजी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 12:31 PM2019-05-03T12:31:10+5:302019-05-03T12:31:19+5:30
अकोला : सीबीएसई इयत्ता बारावीचा निकाल २ मे रोजी दुपारी घोषित झाला असून, या निकालामध्ये अकोला आणि वाशिम जिल्ह्यात मुलींनी बाजी मारली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सीबीएसई इयत्ता बारावीचा निकाल २ मे रोजी दुपारी घोषित झाला असून, या निकालामध्ये अकोला आणि वाशिम जिल्ह्यात मुलींनी बाजी मारली आहे. यात वाशिम जिल्ह्यातील राजनंदिनी घुगे, सिद्धी मुंदडा आणि अकोल्यातील प्रभात किड्स स्कूलची विद्यार्थिनी सारंगा पटोकार, स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या श्रुती जैन, माधवी ढेपे, साक्षी घोडकी यांनी बाजी मारली आहे. मुलांमध्ये यज्ञेश मुंदडा, प्रथमेश कुलकर्णी व सागर जाधव गुणवत्ता यादीत चमकला आहे.
अकोल्यातील प्रभात किड्स स्कूलमध्ये सीबीएसई उच्च माध्यमिक इयत्ता बारावीची पहिलीच बॅच असून, प्रभातच्या एकूण २३ विद्यार्थ्यांपैकी ११ विद्यार्थ्यांनी ए ग्रेड प्राप्त केला आहे तर फिजिकल एज्युकेशन या विषयात सर्वच विद्यार्थ्यांनी प्रावीण्य प्राप्त केले आहे. सारंगा हिने ९५ टक्के गुण प्राप्त केले आहेत. जीवशास्त्र विषयामध्ये तिने १०० पैकी ९९ गुण प्राप्त केले आहेत. शाळेचा एकूण निकाल ९५ टक्के लागला आहे. स्कूल आॅफ स्कॉलर्समधील श्रुती जैन हिने ९४.६ टक्के, यज्ञेश मुंदडा याने ९२.८0, माधवी ढेपे हिने ९१.६0, प्रथमेश कुलकर्णी याने ९१.४0, साक्षी घोडकी हिने ८९.४0 टक्के गुण प्राप्त केले. वाशिम जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय आणि भावना पब्लिक स्कूल या दोन्ही शाळांचा निकाल १00 टक्के लागला आहे. जवाहर नवोदय विद्यालय येथील एकूण ४६ विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा दिली होती. जवाहर नवोदय विद्यालयाची राजनंदिनी घुगे हिला ९५.0६ टक्के गुण मिळाले. सिद्धी मुंदडा हिला ९३.0३ टक्के मिळाले. सिद्धीने गणित विषयात १00 पैकी १00 गुण प्राप्त केले. सागर जाधव याला ९१ टक्के गुण मिळाले. एकंदरीत सीबीएसई निकालावरून मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून येत आहेत. (प्रतिनिधी)