‘एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र द्या!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:13 AM2021-06-30T04:13:35+5:302021-06-30T04:13:35+5:30

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा २०१९ परीक्षा ४१३ पदांसाठी घेण्यात आली. या परीक्षेचा अंतिम निकाल १९ जून २०२० रोजी लागून ...

‘Give appointment letters to students who have passed MPSC!’ | ‘एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र द्या!’

‘एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र द्या!’

Next

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा २०१९ परीक्षा ४१३ पदांसाठी घेण्यात आली. या परीक्षेचा अंतिम निकाल १९ जून २०२० रोजी लागून एक वर्ष झाले. तरी राज्य सरकार उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नियुक्ती देण्याबाबत उदासीनता दाखवत आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रचंड परिश्रम घेतले आहे. बहुतांश विद्यार्थ्यांचे आई-वडील शेतकरी, शेतमजूर, कामगार आहेत. तरीही शासन त्यांना नियुक्ती देत नसल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड आर्थिक, सामाजिक व मानसिक तणावाला सामोरे जावे लागत आहे. या नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयानेही निर्णय दिला आहे. त्यामुळे स्टुडंट्स इस्लामिक अर्गनायझेशनने वेळ न घालवता नियुक्तीपत्र लवकरात लवकर द्यावे, अशी मागणी केली. यावेळी एसआयओचे पातूर शाखा अध्यक्ष फुजैल उर रहमान, उबैद उर रहमान आदी उपस्थित होते.

Web Title: ‘Give appointment letters to students who have passed MPSC!’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.