‘पोकरा’योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना द्या- कृषिमंत्री दादाजी भुसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 05:35 PM2020-08-29T17:35:46+5:302020-08-29T17:36:28+5:30

सर्व  प्रलंबित प्रकरणे मार्गी लावून अकोला जिल्ह्याची कामगिरी  सुधारावी,असे निर्देश राज्याचे कृषि, माजी सैनिक कल्याण मंत्री ना. दादाजी भुसे यांनी आज येथील आढावा बैठकीत दिले.

Give the benefits of 'Pokra' scheme to more farmers - Agriculture Minister Dadaji Bhuse | ‘पोकरा’योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना द्या- कृषिमंत्री दादाजी भुसे

‘पोकरा’योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना द्या- कृषिमंत्री दादाजी भुसे

Next

अकोला  स्व. नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प योजना (पोकरा) ही शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणारी योजना असून त्याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळवून द्यावा, या संदर्भातील सर्व  प्रलंबित प्रकरणे मार्गी लावून अकोला जिल्ह्याची कामगिरी  सुधारावी,असे निर्देश राज्याचे कृषि, माजी सैनिक कल्याण मंत्री ना. दादाजी भुसे यांनी आज येथील आढावा बैठकीत दिले.

अकोला जिल्ह्यातील कृषि विषयक योजनांचा आढावा आज ना. दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले, विधान परिषद सदस्य आ. गोपिकिशन बाजोरिया, आ.अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आ. रणधीर सावरकर, आ. नितीन देशमुख, कृषि संचालक नारायण सिसोदे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अमरावती विभागाचे सहसंचालक सुभाष नागरे, उपसंचालक अरुण वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्यातील कृषि विषयक योजनांचा आढावा सादर करण्यात आला. त्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, पिक कर्ज योजना, पिक विमा योजना, जिल्ह्यातील मुग व उडीद पिकावरील कर्ली रोगाचा प्रादुर्भाव तसेच पोकरा योजना यांचा आढावा घेण्यात आला.  यावेळी  माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात  मुग पिकावर कर्ली  रोगाचा प्रादुर्भाव याबाबत माहिती सादर करण्यात आली. हा विषाणू नवीन असल्याने  त्याचे नमुने बंगळुरू येथे प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.  त्यावरील प्रतिबंधात्मक किटकनाशकाच्या शिफारसीबाबत  कृषि विद्यापीठांकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे असे सांगण्यात आले.

जिल्ह्यातील पोकरा योजनेचा आढावा घेतांना ना. भुसे म्हणाले की, राज्यातील १५ जिल्ह्यात हा प्रकल्प सुरु आहे.  त्यात अकोला जिल्ह्याची प्रगती कमी आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामांना  गती देणे आवश्यक आहे. त्यासाठी कृषि विभागाच्या ग्राम ते जिल्हास्तरावरील यंत्रणांनी गती देऊन एका महिन्याच्या आत सर्व प्रलंबित प्रकरणे  मार्गी लावावे, असे निर्देश त्यांनी दिले.  या कामात कुणीही हेतुपुरस्कर दिरंगाई करीत असेल तर त्यावर कारवाई करा,असेही निर्देश त्यांनी दिले.पोकरा योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात तालुकानिहाय आढावा घेतल्यानंतर ना. भुसे म्हणाले की, यासंदर्भातील कार्यान्वयन यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी व्यक्तिशः लक्ष घालून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा. ही योजना शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी आहे.  लवकरात लवकर प्रलंबित कामे मार्गी लावून योजनेची प्रगती दृष्टिपथास येऊ द्या.

 भुसे म्हणाले की, पीएम किसान योजनेचा  लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा यासाठी अकोला जिल्ह्यात महसूल विभाग व कृषि विभागाने शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी संयुक्त मोहिम राबवावी. पिक कर्ज योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात यावा. महात्मा जोतिबा फुले कर्ज मुक्ती योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांनाही  पिक कर्ज घेण्यात कोणतीही अडचण येऊ नये. थकित कर्ज असले तरी शेतकऱ्यांना कर्ज मिळाले पाहिजे, असेही त्यांनी निर्देश दिले.

Web Title: Give the benefits of 'Pokra' scheme to more farmers - Agriculture Minister Dadaji Bhuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.