दंडात्मक कारवाई करून वाहनचालकांना मास्क द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:19 AM2021-05-09T04:19:07+5:302021-05-09T04:19:07+5:30
हिवरखेड : कोरोनाला आळा घालण्यासाठी शासन व प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविल्या जात आहेत. विनाकारण, विनामास्क फिरणाऱ्या वाहनचालकांवर ...
हिवरखेड : कोरोनाला आळा घालण्यासाठी शासन व प्रशासनाच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबविल्या जात आहेत. विनाकारण, विनामास्क फिरणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते व दंड वसूल केला जातो. ही बाब लक्षात घेऊन प्रेस क्लबमार्फत हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये मास्कचे वितरण करून दंडात्मक कारवाई करण्यात आलेल्या वाहनचालकास मास्कचे वाटप करण्याची मागणी केली आहे.
कोरोनाच्या संकटातही काही वाहनचालक नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे चित्र आहे. अशा वाहनचालकांविरुद्ध पोलीस कारवाई करून दंड वसूल करतात. ही बाब लक्षात घेऊन येथील प्रेस क्लबचे उपाध्यक्ष राजेश अस्वार यांच्या पुढाकाराने पोलीस स्टेशनला मास्कचे वाटप केले व दंड वसूल केलेल्या वाहनचालकास मास्क देण्याची मागणी केली. या उपक्रमाचे ठाणेदारांनी कौतुक केले. यावेळी प्रेस क्लबचे संस्थापक श्यामशील भोपळे, प्रेस क्लबचे विद्यमान अध्यक्ष रितेश टिलावत, प्रेस क्लबचे पदाधिकारी प्रा. संतोषकुमार राऊत, जितेंद्र लाखोटिया, किरण सेदानी, गोवर्धन गावंडे, केशव कोरडे, फारुख सौदागर, महेंद्र कराळे आदी उपस्थित होते. (फोटो)