सॉफ्ट ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 10:40 AM2019-12-20T10:40:48+5:302019-12-20T10:44:43+5:30
याप्रकरणी खदान पोलिसांनी संदीप वाटमारे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला खदान पोलिसांनी अटक केली.
अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका २१ वर्षीय तरुणीला सॉफ्ट ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बार्शीटाकळी येथील रहिवासी युवकाने बलात्कार केल्याची घटना गुरुवारी उजेडात आली. याप्रकरणी खदान पोलिसांनी संदीप वाटमारे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला खदान पोलिसांनी अटक केली.
खडकी येथील एका २१ वर्षीय तरुणीसोबत बार्शीटाकळी येथील रहिवासी संदीप श्याम वाटमारे याने मैत्री केली. त्यानंतर या युवतीला कौलखेड परिसरात सॉफ्ट ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन तिला बेशुद्ध केले. त्यानंतर या युवतीशी जबरी संभोग केला. हा प्रकार युवतीच्या लक्षात येताच तिने विरोध केला असता तिचे नग्न फोटो व्हायरल क रण्याची धमकी देऊन तिच्यावर पुन्हा बलात्कार करण्याचा प्रयत्न संदीप वाटमारे याने केला. याप्रकरणी युवतीने खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी संदीप वाटमारे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६, ३७६ (२), ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर तातडीने या युवकाचा शोध घेण्यात आला असून, त्याला बार्शीटाकळी येथून अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून, आरोपीला न्यायालयाने २४ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.सॉफ्ट ड्रिंकमध्ये