वारकरी, कीर्तनकार, कलावंतांना आर्थिक मदत द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:20 AM2021-09-03T04:20:41+5:302021-09-03T04:20:41+5:30

निवेदनात महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय फार मोठ्या प्रमाणात कथा, कीर्तन, प्रवचन, भारूड या माध्यमातून ...

Give financial help to Warkari, kirtankar, artists! | वारकरी, कीर्तनकार, कलावंतांना आर्थिक मदत द्या!

वारकरी, कीर्तनकार, कलावंतांना आर्थिक मदत द्या!

Next

निवेदनात महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय फार मोठ्या प्रमाणात कथा, कीर्तन, प्रवचन, भारूड या माध्यमातून प्रबोधन करून सुसंस्कृत व आदर्श समाज घडविण्याचे कार्य अविरतपणे करीत आहेत. दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे सर्व मंदिरे व कार्यक्रम बंद असल्यामुळे वारकरी संप्रदायातील कीर्तनकार व कलावंतांवर उपासमारीची पाळी आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारकरी मंडळींना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी पातूर तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष हभप अमोल महाराज घुगे, जिल्हाध्यक्ष हभप महादेव महाराज निमकंडे, विठ्ठल महाराज देशमुख (पिंपळखुटा), जगन्नाथ महाराज अमानकर भंडारज, नामदेव त्र्यंबक वांडे सुकळी, वासुदेव पुंडलिक वांडे सुकळी, ज्ञानेश्वर मारुती ठाकरे सांगोळा, विजय सीताराम घोगरे सुकळी, गोवर्धन महाराज भाकरे चतारी, राजू हरिभाऊ रेवाळे विवरा, प्रकाश जगदेव धोत्रे विवरा, दिनेश राजू घुगे पाष्टुल, सुभाष इंगळे पातूर आदींनी केली आहे.

फोटो:

020921\img_20210902_135851.jpg

वारकरी कीर्तनकार कलावंतांना आर्थिक मदत देण्यात यावी

Web Title: Give financial help to Warkari, kirtankar, artists!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.