अकोला शहरात हॉकीला हक्काचे मैदान आणि प्रशिक्षक द्या : खेळाडूंची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 03:35 PM2017-11-23T15:35:04+5:302017-11-23T15:39:02+5:30
अकोला : राष्ट्रीय खेळ हॉकीकरिता अकोला शहरात हक्काचे मैदान देण्यात यावे, तसेच शासनाच्यावतीने हॉकी प्रशिक्षक नियुक्त करण्यात यावे, अशा दोन प्रमुख मागण्यांसाठी मंगळवारी हॉकी खेळाडूंनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली.
वारंवार मागणी करू नही शासनाने महानगरात राष्ट्रीय खेळ हॉकीचे एकही मैदान दिलेले नाही. सर्वोपचार रुग्णालय परिसरातील पोलीस हॉकी मैदानाची जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे गेल्यामुळे हॉकी खेळाडूंना सरावाकरिता मैदान राहिले नाही. हॉकी खेळण्याची इच्छा असूनही विद्यार्थी वर्ग मैदानाअभावी खेळू शकत नाही. जिथे मोकळी जागा मिळाली तिथे जाऊन हॉकी खेळाडू सराव करीत आहेत, असे निवेदनात खेळाडूंनी नमूद केले आहे.
एकेकाळी अकोला शहर हॉकीकरिता प्रसिद्ध होते. अकोला शहरातून ९-१० हॉकी संघ वर्षाला तयार व्हायचे. आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय हॉकी खेळाडू अकोला शहराने दिले आहेत. राज्य-राष्ट्रीयस्तर स्पर्धा अकोला शहरात वर्षातून पाच ते सहा व्हायच्या. पण, आता फक्त वर्षातून एकदा शालेय हॉकी स्पर्धेच्या वेळीच हॉकीची आठवण केली जाते, ते सुद्धा पोलीस मुख्यालय मैदान पुरते, अशी व्यथा अपर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करताना खेळाडूंनी मांडली. ज्येष्ठ हॉकीपटू तथा प्रशिक्षक रमेश शेलार, कुणाल सावदेकर, मयूर चौधरी, जतीन यादव, शुभम अढाऊ, रवी गायकवाड, शाहरू ख खान यांच्या नेतृत्वात निवेदन अपर जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. याप्रसंगी युवा हॉकीपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते.