रासायनिक खतांचे दर कमी करून शेतकऱ्यांना न्याय द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 10:52 AM2021-05-18T10:52:35+5:302021-05-18T10:53:08+5:30
NCP Agitation at Akola : राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या नेतृत्वात साेमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने केली.
अकोला : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीसाठी लागणाऱ्या रासायनिक खतांचे दर प्रतिबॅग तब्बल ६०० ते ७०० रुपयांनी वाढविल्याने शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. त्यामुळे रासायनिक खतांचे वाढलेले दर केंद्र सरकारने त्वरित रद्द करून पूर्वीच्या दरामध्ये किंवा त्यापेक्षा कमी दरामध्ये शेतकऱ्यांना रासायनिक खते उपलब्ध करून द्यावीत, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या नेतृत्वात साेमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर निदर्शने केली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन दिले.
या आंदाेलनात माजी आ. प्रा. तुकाराम बीडकर, माजी आ. हरिदास भदे, माजी आ. बळीराम सिरस्कार, अकोला जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष उज्ज्वला राऊत, युवक महानगराध्यक्ष करन दौड, विभागीय विद्यार्थी अध्यक्ष अविनाश चव्हाण, परिमल लहाने, दिनकरराव वाघ, अश्वजित सिरसाट, जिल्हाध्यक्ष दिनकर निकम, विद्याताई अंभोरे, सुषमा कावरे, अर्चना थोरात आदींनी सहभाग घेतला होता.