आईला प्लाझ्मा द्या हो...मुलाची आर्त हाक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:18 AM2021-05-12T04:18:47+5:302021-05-12T04:18:47+5:30
गेल्या सोळा दिवसांपासून येथील प्रभा रामकृष्ण खंडारे(५०) कोरोना आजाराशी लढा देत आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी कुटुंबीय, त्यांची मुले ...
गेल्या सोळा दिवसांपासून येथील प्रभा रामकृष्ण खंडारे(५०) कोरोना आजाराशी लढा देत आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी कुटुंबीय, त्यांची मुले प्रयत्न करीत आहेत. त्यांना ओ निगेटिव्ह प्लाझ्मा देण्याची गरज आहे. सहृदयी समाजाने प्लाझ्मा देण्यासाठी पुढे यावे. अशी आर्त हाक मातृदिनी मुलगा विशालने दिली आहे. शिर्ला येथील एकाच कुटुंबातील रामकृष्ण खंडारे, प्रभा खंडारे आणि निखिल खंडारे यांना दोन आठवड्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली. त्यापैकी कोविड लस घेतलेले रामकृष्ण खंडारे(६०) हे बरे झाले. दोन आठवड्यांच्या उपचारांनंतर कुटुंबातील निखिल खंडारे हा बरा झाला. मात्र आई प्रभा खंडारे गेल्या १६ दिवसांपासून कोरोनाशी लढा देत आहेत.
त्या अद्यापही ऑक्सिजनवर आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी त्यांना प्लाझ्माची आवश्यकता आहे.
मागील तीन महिन्यांच्या काळात कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे. प्लाझ्मा देण्यासाठी नीलेश खंडारे ९५०३३८११७५ व विशाल खंडारे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
फोटो : प्रभा खंडारे, मेल फोटोत