शेतमालाला योग्य भाव द्या; अन्यथा रास्ता रोको: शंभू सेनेचा इशारा
By Atul.jaiswal | Published: November 14, 2017 04:55 PM2017-11-14T16:55:30+5:302017-11-14T16:56:59+5:30
शासनाने कास्तकारांना त्वरित उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य भाव देऊन त्यांची पिळवणूक बंद करावी व नापिकीमुळे त्रस्त कास्तकारांना दर एकर प्रमाणे मदतीचा हात द्यावा अन्यथा शंभू सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन शंभू सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी याना सोमवारी देण्यात आले.
अकोला : जिल्ह्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक कास्तकार आस्मानी व सुलतानी संकटाने त्रासलेला असून, शेतमालाला भाव मिळत नसल्यामुळे त्याचे आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने कास्तकारांना केवळ आश्वासने देत त्यांची क्रूर थट्टा चालविली आहे. शासनाने कास्तकारांना त्वरित उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य भाव देऊन त्यांची पिळवणूक बंद करावी व नापिकीमुळे त्रस्त कास्तकारांना दर एकर प्रमाणे मदतीचा हात द्यावा अन्यथा शंभू सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन शंभू सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी याना सोमवारी देण्यात आले.
अकोला जिल्ह्यात कमी पर्जन्यमान व वातावरणातील बदलामुळे खरीप पिके धोक्यात आली आहेत. सोयाबीन व कापसावर बोड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. अशामुळे नापिकी निर्माण होऊन कास्तकार आर्थिक संकटात सापडला आहे .खर्चापेक्षा उत्पादन कमी झाले आहे. म्हणून शासनाने पश्चिम विदर्भ हा दुष्काळग्रस्त भाग घोषित करण्याची मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे. या संदर्भात कास्तकारांना एकरी पंधरा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे .शासनाने वरील मागण्यांची आठ दिवसात दखल घेतली नाही तर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात रास्ता रोको करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री,कृषी मंत्री,पालकमंत्री याना देण्यात आल्या आहेत.
शंभू सेनेचे संस्थापक अध्यक्ष अश्विन नवले यांच्या नेतृत्वात मुरली सटाले,संतोष बायस्कर , कैलास खरात , दत्ता मानकर, सचिन मसने, सचिन पाचपोर, किशोर गाडगे, संदीप बोरसे, आशिष वानखडे, अमोल थुकेकर, अश्विन नवघरे, सतीश यादव, मंगेश टापरे, जितू शितोळे, अतुल पाटील, रामा अगम, संदीप कावळे, कसूरकर,भोसले, सचिन पाटील,गजेंद्र नागलकर,रवी खारोडे, पावन वाडेकर, राजेश हांडेकर, राजेश मोरे, दीपक इंगळे, अतुल बाके, परेश मिश्रा, राहुल नागरे,अभिषेक खरसडे, बाळू नृपनारायण, गजानन डाखोरे, श्रीपाद सानप, गोपाळ पाचपोर,रामेश्वर अधम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.