अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:23 AM2021-09-12T04:23:42+5:302021-09-12T04:23:42+5:30
म्हातोडी : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १९५ गावांमध्ये ८६५८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा अंदाज आहे. यातील अकोला तालुक्यातील ...
म्हातोडी : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १९५ गावांमध्ये ८६५८ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा अंदाज आहे. यातील अकोला तालुक्यातील अंदाजे १३४७ हेक्टर क्षेत्रावरील पीक बाधित झाले. यासंदर्भात वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी दोनवाडा गावात पाहणी करून शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत करण्याची मागणी केली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील दोनवाडा, कासली, एकलारा गावात पाहणी केली. यावेळी दोनवाडा गावातील शेतकऱ्यांसोबत वंचित बहुजन आघाडीचे शंकरराव इंगळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन शिराळे, पुरुषोत्तम अहिर, मनोहर बनसोड, शरद इंगोले, अंबादास आठवले, कैलास इंगोले, विनायक जामने, माणिक शिरसाट, उद्धव वानखडे, रामदास खांडेकर, दामू जामने, भीमराव इंगोले, विश्वनाथ इंगोले, शिवसिंग सोळंके, सरोज डोंगरे उपस्थित होते.