दुबार पेरणीकरिता बियाणे द्या!
By admin | Published: August 1, 2015 12:26 AM2015-08-01T00:26:32+5:302015-08-01T00:26:32+5:30
सुकळी येथील शेतक-यांची मागणी.
अकोला : पाऊस नसल्याने सुकळी परिसरातील पेरण्या उलटल्या असून, शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. पुन्हा नव्याने बियाणे खरेदी करण्यासाठी पैसाच नसल्याने, पीक परिस्थितीची पाहणी करून बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी सुकळी येथील शेतकर्यांनी शुक्रवार, ३१ जुलै रोजी जिल्हाधिकार्यांकडे केली.
गेल्या महिन्याभरापासून पाऊस नसल्याने सुकळी व परिसरातील पिके वाळून गेली आहेत. आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकर्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्यातच गतवर्षी पीककर्ज घेतलेल्या अनेक शेतकर्यांचा बँकांनी पीकविमा काढलेला नाही. पाऊस नसल्याने पिके पूर्णत: करपली असून, जनावरांना साधा चारादेखील उपलब्ध नसल्याचे शेतकर्यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या लेखी निवेदनात स्पष्ट केले आहे.