गतीमंद मुलीसोबत दुष्कृत्य करणाऱ्यास कठोर शिक्षा करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 01:20 PM2018-09-14T13:20:42+5:302018-09-14T13:21:55+5:30
गतिमंद मुलीवर दुष्कर्म करणाºया नराधमास कठोर शिक्षा व्हावी व ही शिक्षा देण्यासाठी शासनाने हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे, अशी मागणी अखिल भारतीय बारी महासंघातर्फे शुक्रवारी गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
अकोला : संग्रामूपर तालुक्यातील वानखेड येथील गतिमंद मुलीवर दुष्कर्म करणाºया नराधमास कठोर शिक्षा व्हावी व ही शिक्षा देण्यासाठी शासनाने हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे, अशी मागणी अखिल भारतीय बारी महासंघातर्फे शुक्रवारी गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
वानखेड (जि.बुलडाणा) येथे शनिवारी (ता.८) प्रकाश लोणे या नराधमाने १८ वर्षीय गतिमंद मुलीसोबत दुष्कर्म केले. तसेच कुठेही वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकीसुद्धा दिली. आईवडील घरी आल्यानंतर या घाबरलेल्या मुलीबाबत त्यांना प्रकार समजला. भितीपोटी त्यांनी घटनेच्या दिवशी तक्रार दिली नाही. मात्र दुसºया दिवशी त्यांनी पोलिस ठाणे गाठत प्रकाश लोणे याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दिली. त्याच रात्री पोलिसांनी आरोपिला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता सुरुवातीला पोलिस कोठडी व नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. हे प्रकरण प्रत्येक समाजासाठी लाच्छंनास्पद असून आरोपींना जरब बसविण्यासाठी या प्रकरणात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी समाज बांधवांनी डॉ. पाटील यांच्याकडे केली. यावेळी अखिल भारतीय बारी महासंघाचे संस्थापक रमेशचंद्र घोलप, अकोला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाषराव रौंदळे, राजू पाटील, अमोल ढगे, नारायण ढगे, सुभाषराव हागे, श्याम डाबरे, वरवट बकाल सरपंच श्रीकृष्ण दातार, संतोष टाकळकार, वासुदेव रौंदळे, अशोक टाकळकर, संदीप दामधर, ज्ञानेश्वर हागे, राजेंद्र हागे, उमेश भोपळे, मनोज हागे, अमोल रौंदळे, सचिन हागे, गोपाल धुळे, दीपक हागे, विजय हागे, शुभम ढगे, यांच्यासह असंख्य समाज बांधव उपस्थित होते.