शिक्षक द्या; हिवरखेडच्या विद्यार्थ्यांंचे ‘सीईओं’ना साकडे !

By admin | Published: January 7, 2017 02:32 AM2017-01-07T02:32:33+5:302017-01-07T02:32:33+5:30

तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांंची मागणी.

Give a teacher; Hiccade students 'CEOs'! | शिक्षक द्या; हिवरखेडच्या विद्यार्थ्यांंचे ‘सीईओं’ना साकडे !

शिक्षक द्या; हिवरखेडच्या विद्यार्थ्यांंचे ‘सीईओं’ना साकडे !

Next

अकोला, दि. ६- तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालयात उर्दू विभागात आठ तुकड्यांसाठी एकच शिक्षक कार्यरत असल्याने, शाळेवर शिक्षक देण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांंनी शुक्रवारी जिल्हा परिषदेत धडक देत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना (सीईओ) साकडे घातले. त्यानुषंगाने शाळेवर तातडीने दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी विद्यार्थ्यासह पालकांना दिले. हिवरखेड येथील जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालयाच्या उर्दू विभागांतर्गत मंजूर १0 शिक्षकांच्या पदांपैकी शाळेवर केवळ एकच शिक्षक कार्यरत असून तीन शिक्षक प्रतिनियुक्तीने कार्यरत आहेत. या पृष्ठभूमीवर या शाळेला शिक्षक देण्याचे आश्‍वासन २५ ऑगस्ट २0१६ रोजी दिले होते; मात्र शाळेला अद्याप शिक्षक देण्यात आले नसल्याने, विद्यार्थ्यांंसह पालकांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेत धडक देत शिक्षक देण्याची मागणी केली. त्यानुषंगाने हिवरखेडच्या जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालयात उर्दू विभागाचे दोन शिक्षक देण्याचे निर्देश दिले.

Web Title: Give a teacher; Hiccade students 'CEOs'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.