जिल्हय़ातील पर्यटनाला चालना देणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 01:22 AM2017-08-14T01:22:26+5:302017-08-14T01:22:49+5:30

अकोला : जिल्हय़ातील पर्यटनस्थळांना चालना देण्यासाठी विमानतळाचा प्रश्न गतीने सोडवला जाईल. खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा यांच्या पाठपुराव्याने अकोला जिल्हय़ाचा अनुशेष पूर्ण करण्याचा प्रयत्न करून विकास केला जाईलच, असे पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी येथे सांगितले.

Give tourism to the district! | जिल्हय़ातील पर्यटनाला चालना देणार!

जिल्हय़ातील पर्यटनाला चालना देणार!

Next
ठळक मुद्देराज्यमंत्री मदन येरावार भाजप कार्यालयात सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हय़ातील पर्यटनस्थळांना चालना देण्यासाठी विमानतळाचा प्रश्न गतीने सोडवला जाईल. खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा यांच्या पाठपुराव्याने अकोला जिल्हय़ाचा अनुशेष पूर्ण करण्याचा प्रयत्न करून विकास केला जाईलच, असे पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी येथे सांगितले.
भाजप कार्यालयात आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार शर्मा होते. अतिथी म्हणून खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगर अध्यक्ष किशोर पाटील, महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके, स्थायी समिती सभापती बाळ टाले, डॉ. विनोद बोर्डे, धनंजय गिरधर, संजय जिरापुरे, डॉ. बाबुराव शेळके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलताना येरावार यांनी जिल्हय़ातील पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी विशेष निधी दिला जाईल, तसेच विमानतळाच्या विकासासाठी निधीची मागणी खासदार, आमदारांनी केली असून, त्यासाठी लवकरच आर्थिक तरतूद केली जाईल, असेही सांगितले. असदगड, बाळापूरची छत्री, सिरसोलीची लढाई, पातूर येथील सीतान्हाणी, कापशी, माना येथील पर्यटनस्थळांना चालना देण्याची मागणी महानगर अध्यक्ष मांगटे पाटील यांनी केली. त्यानुसार राज्यमंत्री येरावार यांनी ग्वाही दिली. संचालन डॉ. विनोद बोर्डे यांनी तर आभार श्रीकृष्ण मोरखडे यांनी मानले. यावेळी रवी गावंडे, अनिल गावंडे, रामदास तायडे, चंदा शर्मा, रमण जैन, चंद्रकांत अंधारे, विलास पोटे, अनुप गोसावी, प्रा. उदय देशमुख, राहुल देशमुख, अण्णा उमाळे, नारायण पंचभाई, नीलेश निनोरे, विजय परमार, प्रतुल हातवळणे, राजेंद्र गिरी, सुमन गावंडे, डॉ. अभय जैन, हरीश आलिमचंदानी उपस्थित होते. 

अधिकार्‍यांनी कार्यतत्पर राहावे -खासदार धोत्रे
लोकशाहीत विकास कामे करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी दोन चाके आहेत. लोकप्रतिनिधींना समस्यांची जाण असते, त्यामुळे विकासाच्या दृष्टीने नवराष्ट्र निर्माण करण्यासाठी अधिकार्‍यांनी सदैव कार्यतत्पर असले पाहिजे, असे खासदार धोत्रे म्हणाले. 

दारू दुकानांसदर्भात न्याय द्या - सावरकर
विमानतळासाठी लागणार्‍या जमिनीच्या संपादनाला १२९ कोटी रुपयांची गरज आहे. हा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, देशात सर्वाधिक दालमिल असलेला अकोला जिल्हा आहे, तसेच कापशी तलाव पर्यटनस्थळाचा विकास करावा, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या नावावर महानगरातील वस्त्यांमध्ये कोठेही देशी-विदेशी दारूची दुकाने उघडणे, स्थलांतरित केली जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये शासनाबद्दल रोष निर्माण होत आहे. हा प्रकार थांबवावा, अशी मागणीही त्यांनी केली. 

शहीद गवई यांना श्रद्धांजली
जिल्हय़ातील लोणाग्रा येथील शूर सैनिक शहीद सुमेध गवई यांना कार्यक्रमापूर्वी श्रद्धांजली वाहण्यात आली. 

Web Title: Give tourism to the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.