एक मत द्या, बाकी तुम्ही ठरवा!
By admin | Published: February 16, 2017 11:01 PM2017-02-16T23:01:20+5:302017-02-16T23:01:20+5:30
उमेदवारांचा स्वत:च्या प्रचारावर भर : राजकीय पक्षांच्या पॅनेलमध्ये उभी फूट; क्रॉस व्होटिंग होणार!
अकोला, दि. १५-राजकीय पक्षांनी एका प्रभागातून पॅनेलद्वारे ह्यअ,ब,क,डह्ण प्रवर्गासाठी चार उमेदवार उभे केले आहेत. प्रचारात पॅनेलमधील सर्व उमेदवार एकत्र फिरताना दिसत असले तरी काही उमेदवार ह्यएक मत मला द्या, बाकी तुम्ही ठरवाह्ण अशा पद्धतीचा छुपा प्रचार करीत असल्यामुळे राजकीय पक्षांच्या पॅनेलमध्येच उभी फूट पडल्याचे चित्र समोर येत आहे. या प्रकारामुळे मतदानाच्या दिवशी क्रॉस व्होटिंगची शक्यता वाढली आहे.
महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये यावेळी प्रथमच शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बहुजन महासंघ, एमआयएम, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी राजकीय पक्ष कोणतीही युती किंवा आघाडी न करता स्वबळावर निवडणुका लढवत आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या वतीने प्रभागांमध्ये पॅनेलद्वारे चार उमेदवारांना उभे करण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना राजकीय पक्षांनी ऐन वेळेवर एबी फॉर्म सोपवले. तिकिटासाठी जोरदार फिल्डिंग लावूनही अनेकांना काही प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारी नाकारली. यामुळे पॅनेलची जुळवाजुळव करताना राजकीय पक्षांसह उमेदवारांची दमछाक झाल्याचे चित्र होते. २0१२ मध्ये पार पडलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार उमेदवार रिंगणात होते. त्यावेळी एकाच पक्षाच्या दोन नगरसेवकांचे पाच वर्षांत कधी पटले नाही. एकमेकांना कायम पाण्यात पाहणारे, एकमेकांच्या टक्केवारीवर डल्ला मारण्याचे प्रकारही घडले. त्यामुळे यंदा असा सहकारी नको रे बाप्पा, असे म्हणण्याची वेळ ज्या विद्यमान नगरसेवकांवर आली होती, त्यांना पुन्हा अशाच सहकार्यांसोबत निवडणूक लढविण्याची वेळ आली आहे. सहकारी उमेदवाराला पॅनलमध्ये सोबत घेऊन फिरण्याची वेळ आली. त्यामुळे मतदारांसमोर जाताना अनेकांच्या मनात एक अन् ओठात भलतेच असल्याचे किस्से समोर येत आहेत. काही उमेदवार दिवसभर सोबत प्रचार करीत असले तरी रात्र होताच मतदारांशी संपर्क साधून स्वत:साठी एका मताचा जोगवा मागितला जात असल्याचे प्रकार होत आहेत. या प्रकारामुळे उमेदवारांमध्ये आपसांत अविश्वासाचे वातावरण तयार झाल्याचे दिसून येत आहे.