‘निगरुणा’चे पाणी सिंचनासाठीच द्या; आलेगाववासियांची मागाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 08:47 PM2017-11-21T20:47:53+5:302017-11-21T20:55:24+5:30

अलेगाव : निर्गुणा प्रकल्पाचे पाणी पारस वीज निर्मिती केंद्राला देण्याचा घाट घातला  जात आहे. या धरणाचे पाणी केवळ सिंचनासाठीच उपलब्ध करून देण्याची मागणी  आलेगाव परिसरातील शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात केली  आहे.

Give water to Nigruna for irrigation! | ‘निगरुणा’चे पाणी सिंचनासाठीच द्या; आलेगाववासियांची मागाणी

‘निगरुणा’चे पाणी सिंचनासाठीच द्या; आलेगाववासियांची मागाणी

Next
ठळक मुद्देआलेगाव परिसरातील शेतकर्‍यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदननिर्गुणा प्रकल्पाचे पाणी पारस वीज निर्मिती केंद्राला देण्याचा घाट

लोकमत न्यूज नेटवर्क
अलेगाव (अकोला): निर्गुणा प्रकल्पाचे पाणी पारस वीज निर्मिती केंद्राला देण्याचा घाट घातला  जात आहे. या धरणाचे पाणी केवळ सिंचनासाठीच उपलब्ध करून देण्याची मागणी  आलेगाव परिसरातील शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात केली  आहे. शेतकर्‍यांनी पालकमंत्र्यांनाही याविषयी निवेदन दिले आहे. 
 निगरुणा नदीवरील धरण यावर्षी साठ टक्के भरले आहे. दरवर्षी या धरणाचे पाणी  सिंचनसाठी उपलब्ध होत असते; परंतु यावर्षी पाणीटंचाईमुळे पाणी नियोजन  बैठकीत निर्गुणा प्रकल्पाचे पाणी पारस येथे देण्याचा निर्णय झाल्याची माहिती मिळ ताच आलेगाव भागातील चोंडी, पिंपरडोली, जांब, कार्ला, शेकापूर येथील शेकडो  शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्री, आमदार, बाळापूरचे उपविभागीय  अधिकारी, पाटबंधारे विभाग यांच्याकडे धाव घेऊन निवेदन सादर केले. निर्गुणा  प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठीच उपलब्ध करून देण्याची मागणी या निवेदनात  करण्यात आली. यावर्षी खरीप हंगाम पावसाच्या लहरीपणामुळे पूर्णत: बुडालेला  आहे. त्यामुळे शेतकरी यांना रब्बी पिकासाठी पाणी मिळाल्यास त्यांचा उदरनिर्वाह  होऊ शकतो. रब्बी पिकासाठी पाणी उपलब्ध केल्यास या परिसरातील पिण्याच्या  पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. त्यामुळे या धरणाचे पाणी पारस वीज निर्मिती केंद्राला  न देता सिंचनासाठीच देण्याची मागणी शेतकर्‍यांनी निवेदनात केली आहे. मागणी  मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकर्‍यांनी निवेदनात दिला आहे.

Web Title: Give water to Nigruna for irrigation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.