स्त्रियांना कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी द्या - किशोर शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:16 AM2021-01-14T04:16:24+5:302021-01-14T04:16:24+5:30

अकोट मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिजाऊ जन्मोत्सव व स्त्री सन्मान सोहळा स्थानिक विष्णुपंत ...

Give women a chance to prove their worth - Kishor Shinde | स्त्रियांना कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी द्या - किशोर शिंदे

स्त्रियांना कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी द्या - किशोर शिंदे

Next

अकोट मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिजाऊ जन्मोत्सव व स्त्री सन्मान सोहळा स्थानिक विष्णुपंत गावंडे अभ्यासिकेत आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट विकास अधिकारी किशोर शिंदे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून अकोट पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष महल्ले, सरकारी अधिवक्ता जयकृष्ण गावंडे, आरोग्य अधिकारी डॉ अनिल कापसे, मनीषा शिंदे उपस्थित होते. कोरोनाच्या संकटात जीवाची पर्वा न करता विविध क्षेत्रात समाजसेवा करणाऱ्या कोरोना योध्दांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. वैशाली देवर, डॉ. योगिनी वाघ, डॉ. सीमा मोहोरे, डॉ. रश्मी वाघोडे, डॉ. सुवर्णा गावंडे, डॉ. वैष्णवी भगत, डॉ. रेवती खंडारे, संस्कृती पोटे, मुक्ता काटोले, मीना सांगोळे, विद्या इंगळे, डॉ अश्विनी कुलट यांचा उत्कृष्ट सेवेबद्दल सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन प्रवीण वानखडे, प्रास्ताविक राजेश कुलट, तर आभार अर्चना अनिल सावरकर यांनी मानले. कार्यक्रमाला अनंतराव गावंडे, वाल्मीक भगत, गजानन सावरकर, डॉ. सुहास कुलट, विश्वासराव वसू, गोपाल भांबुरकर, डी. एस. जायले, शरद पांडे, नितीन धोरण, दत्तात्रय तळोकार, भास्कर इंगळे, गजानन गायगोळ, उमेश चोरे, अनिल सावरकर, अ‍ॅड. संतोष खवले, अनिल चौधरी, विष्णुपंत गावंडे अभ्यासिकेचे संचालक प्रशांत सावळे आदी उपस्थित होते. (फोटो)

Web Title: Give women a chance to prove their worth - Kishor Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.