कत्तलीसाठी जात असलेल्या २८ गाेवंशांना जीवनदान; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त
By आशीष गावंडे | Published: July 7, 2024 12:23 AM2024-07-07T00:23:29+5:302024-07-07T00:26:23+5:30
रफीक शाह खैराती शाह (२८), जुनेद इकबाल शेख रूस्तम (३०) दाेन्ही रा. वाकापूर रोड, नायगांव अशी अटक केलेल्या आराेपींची नावे आहेत. तर दुसऱ्या वाहनातील चालक,वाहक फरार झाले.
अकोला: ताजनापेठ परिसरातील कागजीपूरा येथून दाेन चारचाकी वाहनात काेंबलेल्या २८ गाेवंशांना पाेलिस यंत्रणांनी जीवनदान दिले आहे. गाेवंशांना कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याच्या माहितीवरून शनिवारी शहर पाेलिस उपअधीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा व रामदास पेठ पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. या कारवाईत एकूण १५ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रफीक शाह खैराती शाह (२८), जुनेद इकबाल शेख रूस्तम (३०) दाेन्ही रा. वाकापूर रोड, नायगांव अशी अटक केलेल्या आराेपींची नावे आहेत. तर दुसऱ्या वाहनातील चालक,वाहक फरार झाले. शहरातील कागजीपुरा येथील मटण मार्केटमध्ये दाेन वाहनात निर्दयतेने काेंबून काही गाेवंश आणल्याची गाेपनिय माहिती पाेलिसांना मिळाली. यावरुन पाेलिसांनी सापळा रचून गाडी क्रमांक एमएच-३० बीडी ५३९८ व गाडी क्रमांक एमएच- ०४ ईएस ७३३५ या वाहनांना थांबविले. वाहनातून रफीक शाह खैराती शाह, जुनेद शेख रूस्तम यांना ताब्यात घेतले. तर दुसऱ्या वाहनातील गाडी चालक व एक इसम वाहन सोडून पळून गेले. दोन्ही वाहनांची पाहणी केली असता, कत्तलीसाठी निर्दयतेने बांधून असलेले २८ गोवंश आढळून आले. या गाेवंशांची एकुण अंदाजे किंमत ४ लाख ५० हजार रूपये असून दाेन्ही वाहनांसह एकूण १५ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
फरार आराेपींचा शाेध सुरु
या कारवाईत दुसऱ्या एका वाहनातील दाेन आराेपी फरार झाले आहेत. त्यांचा पाेलिसांकडून कसून शाेध घेतला जात आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, ‘डीवायएसपी’ सतीष कुलकर्णी, ‘एलसीबी’प्रमुख शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पीएसआय’ विजय घुगे, पोलिस अंमलदार अनिल खडेकार, संदीप गुजाळ,रवि घिवे, विनय जाधव, मो. नदीम, फिरोज, खुशाल नेमाडे, अंकुश टापरे यांनी केली.