कोरोनाविरुद्धच्या लढाईत ‘जीएमसी’ अ‍ॅक्शन मोडवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 10:31 AM2020-07-12T10:31:01+5:302020-07-12T10:31:23+5:30

कोविडच्या रुग्णांना पोषक आहारासोबतच त्यांच्या तक्रारी तत्काळ निवारणासाठी रुग्णालय प्रशासनातर्फे कार्यपद्धतीमध्ये बदल केला आहे.

GMC in action mode in battle against Corona! | कोरोनाविरुद्धच्या लढाईत ‘जीएमसी’ अ‍ॅक्शन मोडवर!

कोरोनाविरुद्धच्या लढाईत ‘जीएमसी’ अ‍ॅक्शन मोडवर!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला असून, त्याचा संपूर्ण ताण सर्वोपचार रुग्णालयावर आला आहे. अशा परिस्थितीत कोरोना विरुद्धच्या लढाईत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. कोविडच्या रुग्णांना पोषक आहारासोबतच त्यांच्या तक्रारी तत्काळ निवारणासाठी रुग्णालय प्रशासनातर्फे कार्यपद्धतीमध्ये बदल केला आहे. त्यानुसार, अतिजोखमीच्या रुग्णांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने आपल्यालाही कोरोनाची लागण तर होणार नाही, ना या भीतीने अनेक रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात जाण्यास टाळत आहेत. तर ज्यांना कोविडची लक्षणे आहेत, असेही रुग्ण येथील परिस्थितीमुळे दाखल होण्यास टाळत आहेत. लोकांच्या मनातील हीच भीती घालवण्यासाठी ‘जीएमसी’ प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. रुग्णसेवा प्रभावी राबविण्यासाठी विभाग प्रमुखांच्या चार समित्या गठित करण्यात आल्या आहेत. या समित्यांकडे विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने रुग्णांच्या तक्रारीपासून, तर त्यांना मिळणाºया सुविधांच्या योग्य नियोजनासंदर्भात विशेष जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रतिमा उंचावण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यामुळे या समित्यांच्या कामावर लक्ष राहणार आहे.

रुग्णांच्या आहाराच्या गुणवत्तेवर राहणार विशेष लक्ष!
सर्वोपचार रुग्णालयात दाखल कोविडच्या बहुतांश रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब यासह इतर जोखमीचे आजार आहेत. अशा रुग्णांना आहार तज्ज्ञांच्या सांगण्यानुसारच आहार दिला जात आहे. इतर रुग्णांसह अतिजोखमीच्या रुग्णांसाठी दिल्या जाणाºया आहाराची गुणवत्ता राखण्याची जबाबदारीदेखील यातील एका समितीवर आहे.


कोरोनाची लक्षणे आढळल्यास रुग्णांनी त्वरित सरकारी रुग्णालयाशी संपर्क साधावा. वेळेवर उपचार घेतल्याने कोरोना पूर्णपणे बरा होतो. सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांवर चांगला उपचार व्हावा, यासाठी विशेष लक्ष दिले जात असून, कार्यपद्धतीमध्येही बदल करण्यात येत आहेत.
- डॉ मीनाक्षी गजभिये, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला

 

Web Title: GMC in action mode in battle against Corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.