Coronavirus : कोरोनासाठी जीएमसीत आयसुलेट वार्ड; पण सुरक्षेचं काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 04:36 PM2020-02-03T16:36:09+5:302020-02-03T16:36:16+5:30
Coronavirus : सर्वोपचार रुग्णालयातील जुन्या टीबी वॉर्डात कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र आयसुलेट वार्ड तयार करण्यात आला आहे.
अकोला : कोरोना व्हायरसच्या संशयित रुग्णांसाठी अकोल्यात स्वतंत्र आयसुलेट वॉर्ड सुरू करण्यात आला; मात्र येथे नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचं काय? नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणाºया आरोग्य विभागाकडून येथे नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले आहे.
सर्वोपचार रुग्णालयातील जुन्या टीबी वॉर्डात कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र आयसुलेट वार्ड तयार करण्यात आला आहे. हा वॉर्ड विभागातील पाचही जिल्ह्यांतील कोरोना रुग्णांसाठी आहे. त्या अनुषंगाने येथे दहा खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय, सहा परिचारिकांचीही प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे; मात्र कोरोना व्हायरसचा संसर्ग एकापासून दुसºयापर्यंत थेट पसरत असल्याने योग्य सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. तसे आवाहनदेखील आरोग्य विभागाकडून केले जात आहे; परंतु नागरिकांना आवाहन करताना येथे नियुक्त कर्मचाºयांच्या सुरक्षेकडेच आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे वास्तव आहे. रुग्णांवर उपचार करत असताना वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांना संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे इतरांना आवाहन करत असताना आरोग्य विभागाने येथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांना सुरक्षा साधनं पुरवणे आवश्यक आहे.
सुरक्षा साधनांची खरेदी नाहीच
कोरोना आयसुलेट वॉर्डात रुग्णसेवा देणाºया कर्मचाºयांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा साधनांची गरज आहे. सद्यस्थितीत जीएमसीत कुठल्याच प्रकारची सुरक्षा साधने उपलब्ध नाहीत; मात्र दोन दिवसात मास्क, गाऊन, बुटांची खरेदी केली जाणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी सांगितले होते; मात्र अद्यापही आरोग्य विभागातर्फे सुरक्षा साधनांची खरेदी करण्यात आलेली नाही.
कोरोना व्हायरसने ग्रस्त रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेल्या आयसुलेट वार्डात दहा खाटांची व्यवस्था करण्यात आली असून, सहा परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय, येथे कार्यरत कर्मचाºयांच्या सुरक्षेसाठी मास्क, गाऊन, बुटांची खरेदी केली जाणार आहे.
- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला.