‘जीएमसी’चे सुरक्षा कवच झाले बळकट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 02:05 AM2017-10-12T02:05:41+5:302017-10-12T02:05:59+5:30
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालय परिसराची सुरक्षा करण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बल (मसुब)च्या सुरक्षारक्षकांची २७ जवानांची तुकडी बुधवारी येथे दाखल झाली. यापूर्वी येथे तैनात असलेल्या ‘मसुब’चे ५२ सुरक्षारक्षक १९ सप्टेंबरपासून संघटनेच्या निर्देशाप्रमाणे संपावर गेल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आल्यानंतर ही नवीन तुकडी दाखल झाल्याने ‘जीएमसी’ व सवरेपचार रुग्णालयाचे सुरक्षा कवच बळकट होण्यास मदतच होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालय परिसराची सुरक्षा करण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बल (मसुब)च्या सुरक्षारक्षकांची २७ जवानांची तुकडी बुधवारी येथे दाखल झाली. यापूर्वी येथे तैनात असलेल्या ‘मसुब’चे ५२ सुरक्षारक्षक १९ सप्टेंबरपासून संघटनेच्या निर्देशाप्रमाणे संपावर गेल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आल्यानंतर ही नवीन तुकडी दाखल झाल्याने ‘जीएमसी’ व सवरेपचार रुग्णालयाचे सुरक्षा कवच बळकट होण्यास मदतच होणार आहे. सुरक्षारक्षकांच्या संपानंतर सवरेपचार रुग्णालयाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते, हे येथे उल्लेखनीय आहे.
तब्बल २५ एकरांचा विस्तीर्ण परिसर, २८ इमारती व तेवढेच वॉर्ड तसेच हजारोंच्या संख्येने येणारे रुग्ण या सर्व यंत्रणेची सुरक्षा करण्यासाठी जुलै महिन्यात ‘मसुब’चे ५३ सुरक्षारक्षक येथे तैनात करण्यात आले होते.
शिवाय, ‘मेस्को’ व खासगी सुरक्षारक्षकही दिमतीला आहेतच. गत महिन्यात मसुबचे सुरक्षारक्षक अचानक संपावर गेल्याने सवरेपचारची सुरक्षा कमकुवत झाली होती. दरम्यान, संपावर गेलेल्या सुरक्षारक्षकांना बडतर्फ करण्यात आल्यानंतर बुधवारी ‘मसुब’चे २७ सुरक्षारक्षकांचे दल सवरेपचारमध्ये दाखल झाले. यामध्ये १५ महिलांचाही समावेश आहे. राज्याच्या विविध भागांमधून आलेल्या या सुरक्षारक्षकांच्या तैनातीने सवरेपचारची सुरक्षा मजबूत होणार आहे.
संख्या वाढणार
‘जीएमसी’मध्ये पूर्वी ५२ सुरक्षारक्षक व तीन समन्वयक अशी ५५ जणांची तुकडी तैनात होती. संपानंतर आता २७ जणांची नवी तुकडी दाखल झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत उर्वरित सुरक्षारक्षकही दाखल होणार असल्याचे सवरेपचार प्रशासनाकडून सांगण्यात आले.